वृद्ध सहकाऱ्यांनाही तीच वागणूक
नवी दिल्ली – लेह प्रांताच्या काही मागण्यांसाठी पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लेह ते दिल्ली अशी महिनाभराची पदयात्रा काढून शांतता आणि प्रेमाचा संदेश देत आलेल्या 150 कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोनम वांगचूक यांनी स्वतः या संदर्भात समाज माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित करून ही माहिती दिली आहे . त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आम्ही 30 सप्टेंबर 2024 रोजी रात्री दिल्ली सीमेवर पोहोचलो .आमच्या सोबत असलेल्या दीडशे कार्यकर्त्यांमध्ये अनेक कार्यकर्ते 80 वर्षावरील वृद्ध आहेत .चालून – चालून अनेकांच्या पायाला फोड आलेले आहेत . आम्ही शांतीमार्च काढलेला असताना दिल्ली सीमेवर रात्री तैनात असलेल्या 1000 पेक्षा अधिक पोलिसांनी आम्हाला अशा प्रकारे ताब्यात घेऊन काय साध्य केले ? ‘यापुढे आमचे भवितव्य काय आहे ते ठाऊक नसल्याचेही वांगचूक म्हणाले .
आम्ही दिल्ली येथे जाऊन 2 ऑक्टोबर 2024 रोजी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार होतो . त्यानंतर दिल्लीतील राष्ट्रपती , पंतप्रधान आदी मान्यवर नेत्यांना भेटून लेह प्रांताच्या मागण्यांची माहिती त्यांना देणार होतो असेही वांगचूक म्हणाले .
दोन दिवसापूर्वी आम्ही चंदिगड येथे होतो . चंदीगड हे अतिशय सुंदर शहर आहे या शहरांमध्ये सायकल साठी वेगळा ट्रॅक आहे . मात्र या सायकल ट्रॅकवरून एकही सायकलस्वार मला दिसला नाही . देशातील तरुण पिढीने सायकलसारख्या पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करावा असे आवाहन त्यांनी तेथे केले होते .महिन्याभराच्या संपूर्ण पदयात्रेत आम्हाला ठिकठिकाणी त्या त्या राज्यातील नागरिक आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य भेटले आणि प्रेम मिळाले असेही वांगचूक म्हणाले .चंदीगड वरून दिल्ली येथे जाताना मध्ये हरियाणा राज्य आहे या राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने त्यापासून द दूर राहणे आम्ही पसंत केले . त्यामुळे चंदीगढहून ट्रक मध्ये बसून हरियाणा पार केले . दिल्ली सीमेवर आल्यावर पदयात्रा सुरु केली तेव्हा पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले असे वांगचूक म्हणाले .
जम्मू – काश्मीर पासून लेह प्रांत वेगळा करताना पंतप्रधानांनी या प्रांतासाठी काही आश्वासने दिली होती . त्या आश्वासनाची पूर्ती व्हावी अशी पदयात्रेतील कार्यकर्त्यांची मागणी आहे .याच मागणीसाठी यापूर्वी सोनम वांगचुक यांनी तीन आठवड्यांचे उपोषण केले होते . मात्र त्यावेळी लोकसभेची निवडणूक असल्याने तेव्हा उपोषण मागे घेतले होते . त्यानंतर याच मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2024 पासून त्यांनी ही पदयात्रा काढलेली आहे .
वांगचूक यांनी यासंदर्भात प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की आम्ही अतिशय शांततेत ही पदयात्रा काढली होती असे असताना हजाराहून अधिक पोलिसांचा ताफाआम्हाला येथे अडवण्यासाठी उभा होता . आम्ही राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेणार होतो आणि शांततेत आमच्या मागण्या दिल्लीतील उच्च पदस्थांपुढे मांडणार होतो . असे असताना या यात्रेतील 80 वर्षावरील वृद्धांसह सर्वांना ताब्यामध्ये घेण्याची काय आवश्यकता होती ? आमचे भवितव्य काय आहे ते आम्हाला ठाऊक नाही असेही वांगचूक यांनी म्हटले आहे .
दोन दिवसापूर्वी वांगचूक आणि त्यांचे सहकारी चंदीगड येथे मुक्कामी होते तेथे त्यांनी सायकल ट्रॅक वर फिरवून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यामध्ये ते म्हणतात चंदिगड हे अतिशय सुंदर शहर आहे या ठिकाणी खूप चांगला सायकल ट्रॅक आहे पण या सायकल ट्रॅकवर एकही व्यक्ती सायकल घेऊन आलेली भेटली नाही याबद्दल मला दुःख वाटले .नंतर त्यांनी चंदीगड मधील नागरिकांबरोबर संवाद साधला आणि चंदिगड शहराचे मनापासून कौतुक केले .
लेह प्रांताच्या मागण्या संदर्भात वांगचूक म्हणाले की आम्हाला केवळ लेह प्रांताला पंतप्रधानांनी जी आश्वासने दिली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता हवी आहे .आमच्याकडे निवडणुका घेतल्या जाव्यात , दोन लोकसभा मतदारसंघ निर्माण केले जावे , स्वायत्तता द्यावी आणि घटनेच्या सहाव्या अनुसूचीनुसार संरक्षण मिळावे अशा प्रमुख मागण्या आम्ही केलेल्या आहेत . या मागणीसाठी ही पदयात्रा काढली असल्याचे त्यांनी सांगितले
, लेह , कारगील बंद
सोनम वांगचूक आणि सहकाऱ्यांना रात्री अटक केल्याची बातमी समजतात लेह आणि कारगिल प्रांतातील नागरिकांनी बंद पुकारला आहे . .