12 ऑक्टोबर अमेरिकेत कोलंबस दिवस म्हणून साजरा केला जातो
न्यूयॉर्क – भारताच्या शोधासाठी निघालेला कोलंबस कधीच भारतात पोहोचला नाही. कोलंबसाने चुकून अमेरिकेचा शोध लावला असे म्हटले जाते तेही खरे नाही तो अमेरिकेतही कधी पोहोचला नाही. कोलंबसाने भारताचा आणि अमेरिकेचा शोध लावला नाही सिमला मिरचीचा शोध लावला हे मात्र सत्य आहे.
हिरव्या, लाल, नारिंगी, पिवळया रंगाची सिमला मिरची भारतीय खाद्यपदार्थांची चव वाढवते. आपल्या सर्वांच्या आवडत्या पावभाजीत तर तिला हक्काचे स्थान आहे. मात्र सिमला मिरचीचा शोध लावल्याबद्दल आपण कोलंबसाचे आभार मानायला हवेत.
कोलंबसला त्याच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत समजले नाही की आपण जो भूभाग शोधला तो भारत नाही. भारत शोधल्याचा आनंद मनात साठवूनच त्याची अखेर झाली. त्याने शोधलेली शिमला मिरची मात्र इंग्रजांबरोबर भारतात आली. इंग्रजांना सिमला भागात हे पीक चांगले वाढेल असे वाटल्याने त्यांनी सिमला भागात या पिकाचे उत्पादन घेतले. सगळीकरे सिमला मिरचीचे जोरदार उत्पादन आले आणि तेथून भारतभर पोहोचले. भारतात या मिरचीचे उत्पादन पहिल्यांदा सिमला येथे झाल्याने त्त्याला भारतात सिमला मिरची नाव पडले.
ख्रिस्तोफर कोलंबस, हा इटालियन खलाशीआणि नवे शोध घेणारा धाडसी व्यक्ती होता. भारत तेव्हा व्यापारासाठी प्रसिध्द होता, त्यामुळे कोलंबसला भारताचा शोध घेण्याची इच्छा होती. कोलंबसला यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. स्पेनच्या राजाने कोलंबसला मदत केली. तीन जहाजे 90 सहकारी घेऊन 3 ऑगस्ट 1492 रोजी समुद्रमार्गे प्रवासास सुरुवात केली.
कोलंबस अमेरिकच्या मुख्य भागात कधी पोहोचलाच नाही.क्रिस्टोफर कोलंबसच्या आधी पाच लोक अमेरिकेला पोहोचले होते. कोलंबस 12 ऑक्टोबर 1492 रोजी तो अमेरिकेजवळील बेटांवर पोहोचला. जेव्हा कोलंबसला काहीतरी लाल आणि हिरवे दिसले, तेव्हा त्याला वाटले की तो भारतात पोहोचला आहे. त्या बेटांना तो भारत समजला, त्या भागालाच त्याने इंडीज नाव दिले. तिथे पाच महिने राहून तो स्पेनला परतला.
त्या बेटांबर सिमला मिरचीचे ( कॅप्सिकम ) भरपूर उत्पादन होत होते. स्पेनच्या राजालाआवडेल म्हणून त्याने जहाज विविध प्रकारच्या कॅप्सिकमने भरले. राणी इसाबेला आणि स्पेनचा राजा फर्डिनांड यांनी त्याला भारतात जाण्याचा मार्ग शोधण्याचे काम सोपवले होते, जेणेकरून भारताबरोबर मसाल्यांचा व्यापार होऊ शकेल. कॅरिबियन बेटावर कोलंबसला कॅप्सिकम सापडले ते युरोपीय लोकांनी कधीही चाखले नव्हते. त्यांला वाटले ही नवीन भाजी सर्वांना आवडेल.स्पेनच्या शाही बागेत सिमला मिरचीची लागवड केली. खूप पीक आले. स्पेनच्या शाही बागेत कॅप्सिकमची झाडे लावली गेली आणि त्यानंतर येथूनच त्याचा व्यवसाय सुरू झाला. स्पेन आणि इटलीमध्ये, कॅप्सिकम ही प्रत्येक पदार्थाची सर्वात मोठी गरज बनली. युरोपमध्ये पोहोचल्यानंतर, लाल आणि हिरव्या शिमला मिरचीला स्पॅनिश पेप्पर म्हटले जाऊ लागले. त्याची लोकप्रियता संपूर्ण भूमध्य बेटावर पसरू लागली आणि त्याचा सुगंध इंग्लंडच्या लोकांपर्यंतही पोहोचला.
कोलंबस अमेरिकेजवळच्या बेटांवर पोहोचला होता. त्यामुळे अमेरिकेला जाण्याचा मार्ग युरोपीय आणि इतर देशांना कळाला , त्यामुळे अमेरिकेशी व्यापाराचे मार्ग खुले झाले. 12 ऑक्टोबर रोजी कोलंबस अमेरिकेजवळ पोहोचला, त्याची कृतज्ञता म्हणून अमेरिकेत काही प्रांतात 12 ऑक्टोबर कोलंबस दिवस म्हणून साजरा केला जातो.
इंग्रज भारतावर राज्य करीत होते तेव्हा इंग्रजांबरोबर सिमला मिरची भारतात आली. इंग्रजांना वाटले की सिमला भागात या मिरचीचे उत्पादन चांगले येईल , त्यामुळे त्यांनी सिमला भागात प्रथम या मिरचीची लागवड केली. त्या परिसरात सिमला मिरचीचे उत्पादन बहरले. त्यानंतर भारताच्या सर्व भागात सिमला मिरचीचे उत्पादन घेतले जाऊ लागले. सिमला येथे या मिरचीचे प्रथम उत्पादन घेतल्याने या मिरचीला भारतात सिमला मिरची म्हटले जाते.