तीन आठवड्यांपासून वर्ग बंदच
पतियाळा – येथील राजीव गांधी राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी 6 ऑक्टोबर 2024 पासून कुलगुरुंच्या राजीनाम्यासाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे . यातील तीन- चार विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे . कुलगुरुंनी मात्र राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे .
राजीव गांधी राष्ट्रीय विधी विद्यापीठातील कुलगुरु जयशंकर सिंह दुपारी अचानक विद्यार्थिनी वसतिगृहातील मुलींच्या खोल्यांमध्ये गेले . यावेळी तुम्ही शॉर्टस का घालता अशा प्रकारची विचारणाही केली . वसतिगृहात मुलींच्या खोलीत मुलींच्या पालकांनाही प्रवेश नसतो असा नियम आहे .मात्र कुलगुरूंनी दिलेल्या या अचानक भेटीमुळे संतापलेल्या विद्यार्थिंनींना विद्यार्थ्यांनीही साथ दिली आणि 22 सप्टेंबर 2024 पासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे . तेव्हापासून विद्यापीठातील वर्गही बंद आहेत .
‘ आओ शंकर , हमसे ना घबराओ शंकर ‘ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला आहे कुलगुरु आमच्या पालकांना बोलावून घेऊन वर दबाव आणत असल्याचे विद्यार्थ्यांचे मृणणे आहे .
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 27 सप्टेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांना मी तुमच्या बाजूनेच आहे असे आश्वासन दिले . महिला आयोगाने कुलगुरूंनी राजीनामा द्यावा अशी शिफारस केली आहे
आंदोलनास पंधरा दिवस होऊनही कुलगुरु राजीनामा देण्यास नकार देत आहेत म्हणून अखेरीस विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 6 ऑक्टोबर 2024 पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे .
कुलगुरूं सिंह यांनी पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थिनींना बोलावून चर्चा करण्याचा प्रयत्न केला . मी कुठलीही चूक केली नाही आणि वसतिगृह भेटीवेळी माझ्यासोबत महिला वॉर्डन होत्या असे कुलगुरू जगदेश्वर यांचे म्हणणे आहे कुलगुरूंनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते मात्र कुलगुरुंनी त्यास नकार दिला . जमावासोबत चर्चा होऊ शकत नाही व माझ्या सुरक्षेला तिथे धोका होऊ शकतो असे कुलगुरुंचे म्हणणे आहे . वीस दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनात अद्यापही मार्ग निघू शकलेला नाही .