नवी दिल्ली – पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे .
लडाख प्रांताला सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावी लडाखला लढाकल स्वतंत्र विधानसभा निर्माण केली जावी , या प्रांतासाठी दोन लोकसभा मतदारसंघ दिले जावेत , लडाखमध्ये लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात तसेच संविधानाच्या अनुसूची सहाचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी वांगचूक यांचे हे आंदोलन सुरू आहे .
लडाख प्रांताच्या विविध मागण्यांसाठी सोनम वांगचूक आणि त्यांच्या जवळपास दीडशे सहकाऱ्यांनी लेह ते दिल्ली असे एक हजार किलोमीटरची पदयात्रा काढली . ही पदयात्रा 30 सप्टेंबरला दिल्ली येथे पोहोचली तेव्हा पोलिसांनी सोनम वांगचूक आणि सहकाऱ्यांना अटक केली होती . त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री पोलिसांनी त्यांची सुटका केली .
त्यानंतर सोनम वांगचूक आणि त्यांचे काही . सहकारी लडाख भवन येथे एक आठवड्यापासून उपोषण करीत होते . आज दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी लडाख भवन समोर वांगचूक आणि 20 सहकारी उपोषण करीत शांततेत बसले होते .मात्र पोलिसांनी वांगचूक आणि सहकाऱ्यांना अटक केली . .आम्ही शांततेत बसलो आहोत आम्हाला अटक का करता ?अशी विचारणा केली असता दिल्ली शहरात वर्षभर कलम 163 लागू असते त्यामुळे परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला येथे बसता येणार नाही असे दिल्ली पोलिसांनी त्यांना सांगितले .
जेव्हा कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच कलम 163 लागू केले जाते .मात्र भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्ली येथे वर्षभर कलम 163 लागू केलेले असते .हे लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया सोनम वांगचूक यांनी व्यक्त केली आहे .
ज्यांना आम्ही ताब्यात घेतले त्यांना लवकरच सोडू असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे .