सोलापूर, दि. 19- महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे अजय बळवंत देशमुख तर उपाध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे यांची फेर निवड झाली.
गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला महाराष्ट्रातील एस. एन. डी. टी. विद्यापीठ, मुबंई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड, कवी कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या विद्यापीठातील महासंघ कार्यकारिणी प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अजय बळवंत देशमुख, अमरावती यांची महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. कैलास पाथ्रीकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांची कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. मिलींद भोसले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महासचिव सोमनाथ सोनकांबळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांची उपाध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली.
श्री सोनकांबळे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या 14 वर्षापासुन कार्यरत असुन सध्या ते सहाय्यक कुलसचिव (वर्ग -१) पदावर कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठात आठ वर्षे प्रशासकीय कर्मचारी म्हणुन सेवा बजावली आहे. श्री. सोनकांबळे हे विज्ञान शाखेचे पदवीधर असुन त्यांचा गणेशोत्सव, नवरात्र, महापुरुषांच्या जयंत्या इ. सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असतो. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक इ. क्षेत्रात सोनकांबळे यांचा मोठा जनसंपर्क असून सर्वच स्तरात मोठा मित्र परिवार आहे. विद्यापीठ कर्मचार्यांच्या वेतन आयोग, फरक व इतर मागण्यासाठी विविध आंदोलने व भेटीगाठी घेवुन शासन स्तरावर कर्मचार्यांचे प्रश्न, कर्मचार्यांची बाजू मांडणे यासाठी ते नेहमीच आग्रही असतात.
त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु डाॅ. लक्ष्मीकांत दामा तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे व मान्यवरांनी सोनकांबळे यांचे अभिनंदन केले आहे.