Thursday, November 21, 2024
Homeपर्यावरणडिसेंबरमध्ये लडाखबाबत चर्चा होणार

डिसेंबरमध्ये लडाखबाबत चर्चा होणार

सोनम वांगचूक आणि सहका-यांनी उपोषण संपविले

नवी दिल्ली –  सोनम वांगचुक आणि सहका-यांनी  15 दिवसांपासून सुरु केले उपोषण मागे घेतले आहे. लडाखच्या मागण्यांवरील चर्चा डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू केली जाईल उच्चस्तरीय समिती (एचपीसी) आपली पुढील बैठक 3 डिसेंबर 2024 रोजी नॉर्थ ब्लॉक येथे घेईल.असे गृह मंत्रालयाने आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 

लडाख प्रांतााच्या मागण्यांसाठी वांगचूक आणि  सहका-यांनी 1 सप्टेंबर 2024 पासून लेह ते ‘दिल्ली पदयात्रा काढली.  30 सप्टेंबरच्या रात्री सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी त्यांना  ताब्यात घेतले.

लेहच्या सर्वोच्च संस्थेने या मोर्चाचे आयोजन केले होते. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी एल. ए. बी., कारगिल लोकशाही आघाडीसह (के. डी. ए.) आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.सोनम वंगचूक यांनी आझाद भवन येथे उपोषणास बसण्याची परवानगी मागितली , मात्र ती नाकारण्यात आल्याने ते व त्यांचे सहकरी  6 ऑक्टोबर 2024 पासून लडाख भवन येथे उपोषणास  बसले होते.जम्मू-काश्मीर आणि लडाखचे संयुक्त सचिव प्रशांत लोखंडे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना गृह मंत्रालयाचे पत्र दिले.लडाखच्या मागण्यांवरील चर्चा डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू केली जाईल उच्चस्तरीय समिती (एचपीसी) आपली पुढील बैठक 3 डिसेंबर 2024 रोजी नॉर्थ ब्लॉक येथे घेईल.असे आश्वासन गृह मंत्रालयाने या पत्रात दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. 

जंतर मंतरवर शांततापूर्ण निदर्शने करण्याची विनंती फेटाळत दिल्ली पोलीस आयुक्तांनी 5 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या पत्रामुळे संघटना व्यथित झाली.हा नकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 (1) (अ) आणि 19 (1) (ब) अंतर्गत संघटनेच्या भाषण आणि शांततापूर्ण सभेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतो, असे याचिकेत म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments