वकिलाने विचारताच सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी
नवी दिल्ली (पीटीआय): सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे असे दिल्ली उच्च न्यायालयातील एका वकिलाने विचारताच सर्वोच्च न्यायलयाने आगीत तेल ओतण्याचे काम करु नका म्हणत कान उघाडणी केली.
दिल्लीच्या बार संस्थांमध्ये महिला वकिलांना आरक्षण देण्याच्या तीन याचिकांवर न्यायालय सुनावणी करत आहे. दिल्ली उच्च न्यायालय बार एसोसिएशन (DHCBA) , उच्च न्यायालय बार असोसिएशन (H.C.B.A.) आणि सर्व जिल्हा वकील संघटना या त्या तीन संघटना आहेत.
यापैकी एक याचिका वकील शोभा गुप्ता यांनी दाखल केली होती, ज्यांनी असा युक्तिवाद केला आहे की बी. सी. डी. आणि इतर बार संघटनांमध्ये प्रभावशाली पदांवर महिलांचे कमी प्रतिनिधित्व त्यांच्या हक्कांवर आणि न्याय मिळवण्यावर नकारात्मक परिणाम करू शकते तसेच न्याय व्यवस्थेच्या एकूण परिणामकारकतेपासून दूर जाऊ शकते.गुप्ता यांनी सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत दिल्लीतील सर्व अॅडव्होकेट बारसाठी आगामी बार कौन्सिल निवडणुकीत 33% आरक्षणासाठी निर्देश देण्याची मागणी केली होती. परंतु 11 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
त्यामुळे याचिकाकर्त्यंनी सर्वोच्च न्य्ययालयात धाव घेतली.न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान ही घटना घडली. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे अशी विचारणा करताच “पुरे झाले. आगीत तेल ाोतण्याचे काम करु नका. माध्यमांचे लक्ष वेधण्यास असे म्हणत असाल तर द्हा वेळा म्हणा . पण बार असोसिएशनच्या सुनावणीत असे घडणे हे योग्य नाही असे म्हणत वकिलाची कानउघाडणी केली. संतप्त खंडपीठाने बार संस्थेकडून पुढील कोणतेही स्पष्टीकरण ऐकण्यास नकार दिला.”आम्ही काही ऐकणार नाही. आता, आम्ही या प्रकरणाच्या मोठ्या मुद्द्यावर जाऊ आणि शेवटी या विषयावर निर्णय घेऊ “, असे त्यात म्हटले आहे.खंडपीठाने अंतिम युक्तिवादासाठी 29 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आणि या प्रकरणावरील निकाल तीन दिवसांत जाहीर केला जाईल असे सांगितले.