दुबई – खेळण्याच्या वयात जैनम आणि जिविका या दुबईतील भावंडांनी किशोरवयीन भावंडांनी भारतातील श्रीमंत उद्योगपती अंबानींच्या रिलायन्स कंपनीला मदत करण्याचे ठरविले आहे आणि रिलायन्सनेही ती मदत स्वीकारायचे ठरविले आहे.
जैनम आणि जीविका मूळचे महाराष्ट्रातील मालेगाव या छोट्याशा गावातील रहिवासी अाहेत. ते आता दुबईत स्थायिक झाले आहेत. जैनम आणि जीविका यांनी त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याने विज्ञान सुलभ करण्याचे आणि तरुण मनांना गुंतवून ठेवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. गतवर्षी त्यांनी भारताचा दौरा करुन भारतीय विद्यार्थ्यासाठीही काही उपक्रम राबविले. त्यांनी भारतातील विविध शहरे आणि गावांमध्ये 50 दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली, विज्ञान जागरूकता कार्यक्रम आयोजित केले ज्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
13 वर्षीय जैनम आणि 10 वर्षीय जीविका ही केवळ भावंडे नाहीत; ते दुबईमध्ये आशय निर्माते आहेत, जे त्यांच्या शैक्षणिक आणि मनोरंजक यूट्यूब चॅनेलसाठी ओळखले जातात. त्यांचे ‘जेजे फन टाइम’ हे लोकप्रिय यूट्यूब चॅनेल देखील आहे, ते केवळ विज्ञानाबद्दल नाही तर सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याबद्दल देखील प्रसिध्द आहे.2017 पासून, ते कुटुंब-अनुकूल व्हिडिओ, डी. आय. वाय. प्रकल्प आणि खेळणी आणि खेळांवर केंद्रित सामग्री तयार करत आहेत. जैनम – जीविका फाउंडेशनचा उद्देश वंचित मुलांना पाठिंबा देणे, सामाजिक कारणांबद्दलची त्यांची बांधिलकी दर्शविणे हा आहे. संचालक म्हणून कांतिलाल शंकरलाल जैन आणि शोभा कांतिलाल जैन यांच्या नेतृत्वाखालील या संस्थेमध्ये सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी भावंडांचे समर्पण प्रतिबिंबित होते.
ही दोन भावंडे अशात चर्चेत आली , त्याचे कारण म्हणजे Jiohotstar.com डोमेनची मालकी गतवर्षी जैनाम आणि जिविकाकडे आली. दिल्लीतील एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने गेल्या वर्षी जिओहॉटस्टार डोमेनची प्रथम नोंदणी केली. केंब्रिज विद्यापीठातील पुढील शिक्षणासाठी डोमेनची मालकी हस्तांतरित करण्यासाठी रिलायन्स कंपनीकडे पैसे मागितले. रिलायन्सने त्याला पैसे दिले नाहीत. दुबईतील जैनम आणि जिविका भावंडांनी नंतर हे डोमेन त्याच्या मूळ मालकाकडून त्या तरुणाकडून विकत घेतले. दिल्लीतील त्या तरुण विकासकाला शिक्षणासाठी मदत करण्यासाठी त्यांनी हे डोमेन नेम विकत घेतले.
आता जैनम आणि जीविकाने JioHotstar.com वेबसाइटवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रिलायन्स आयपी लीगल टीमने संपर्क साधल्यानंतर त्यांनी व्यवसायाला मदत होईल या आशेने रिलायन्सला विनामूल्य डोमेन देण्याचा निर्णय घेतलाआहे. रिलायन्स आयपीच्या कायदेशीर चमूने आमच्याशी संपर्क साधला आहे आणि आम्ही हे डोमेन त्यांच्याकडे विनामूल्य हस्तांतरित करणार आहोत”, असे त्यांनी म्हटले आहे. .
जैनम आणि जीविका भावंडांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही त्यांना सांगितले आहे की करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच डोमेन हस्तांतरण होईल. त्यांनी आम्हाला करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मुंबईला येण्यास सांगितले आहे. आम्ही मसुद्याची वाट पाहत आहोत. लवकरच या करारावर स्वाक्षऱ्या होतील, अशी आम्हाला आशा आहे. हे घडताच आम्ही डोमेन हस्तांतरित करू आणि हे संकेतस्थळ संपेल “,