मुंबई – प्रसिध्द व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस येताच संतीश आचार्य यांनी यावर मिश्किल टिपणी करीत करीत म्हटले आहे की ”अरे व्वा, मुंबईत कायदा आणि सुववस्था एवढी छान आहे की, पोलिसांना आता व्यंगचित्राकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे”.
व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी उपमुख्यमंत्री एाकनाथ शिंदे , पंतप्रधान न्रेंद्र मोदी आणि उद्योगपती यांच्यातील संबंध आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षाबाबत काही व्यंगचित्र काढले होते. आचार्य यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, ही व्यंगचित्र काढल्यानंतर आता सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची नोटीस आली आहे.
कार्टुनिस्ट कंबाईन संघटनेचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी म्हटले आहे की, व्यंगचित्रकार कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात. राजकारणी नेते चुका करीत असतील तर ते दाखवून देण्याचे काम व्यंगचित्रकार कलेच्या माध्यमातून करीत असतात, त्याबाबत असे निर्बंध घालणे चुकीचे आहे.
यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करीत व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा हल्ला असल्याचे मत व्यक्त केले आहे.