नवी दिल्ली – बारावीची परीक्षा 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून दोनदा घेण्याचा तसेच अकरावी व बाराचीला सेमेस्टर पध्दती अवलंबिण्याचा विचार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मे्द्र प्रधान यांनी सांगितले. बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनवेळा परीक्षा देण्याची संधी यामुळे मिळेल.
बारवीच्या परीक्षेला बसण्यासाठी वर्षातून दोन पर्याय देणे विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. ज्या दुर्बल विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यासाठी वेळ हवा असतो आणि ज्यांना अयशस्वी होण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरेल. ज्या विद्यार्थ्यांनी 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षांसाठी नोंदणी केली आहे, ते दोन्ही सत्रांसाठी उपस्थित राहू शकतील. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना बसण्याचा पर्याय असेल. ज्या परीक्षेत विद्यार्थ्याने परीक्षेत चांगली कामगिरी केली आहे त्अंय्ता परीक्षेचे गुण अंतिम मानले जातील. विद्यार्थ्यांवरील ओझे कमी होईल, चांगली तयारी होईल वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांवरील बोर्डाच्या परीक्षांचा ताण कमी होईल. तसेच, त्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याची तयारी कमी असेल तर तो पहिल्या सत्रापेक्षा दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत बसू शकेल. जर एखादा विद्यार्थी पहिल्या सत्रात नापास झाला तर तो दुसऱ्या सत्रात हजर राहू शकेल.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 पासून द्विवार्षिक बोर्ड परीक्षा आणि सेमेस्टर प्रणाली लागू केली जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) हा बदल केला जात आहे विद्यार्थ्यांना अधिक चांगला शैक्षणिक अनुभव देणे आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया अधिक सुसंगत करणे हा यामागचा उद्देश आहे.
द