वर्धा – रेल्वे यंत्रणेने प्रवाशांच्या सुविधेसाठी मोठया सुधारणा करणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ सोनम वांगचूक यांनी व्यक्त केले .
मी रेल्वेचा खूप चाहता आहे .मला रेल्वेने प्रवास करणे आवडते . मात्र आता प्रवासात मी जो अनुभव घेतो आहे, तो लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे .मी वर्धा येथे आलेलो आहे, मला इथून नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या जनजाती महोत्सवास सहभागी व्हायचे आहे . मात्र मी नंदूरबार येथे वेळेत पोहोचू शकेल किंवा नाही याची खात्री नाही . कारण माझी रेल्वे सात तास उशिराने धावत आहे .दोन दिवसांपूर्वी नागपूरकडे येतानाही मला हाच अनुभव आला . ती दुरांतो एक्सप्रेस ने नागपूरला जात होतो .मात्र त्या दिवशीही आमची रेल्वे सहा तास उशिरा धावत होती . या मागच्या कारणाचा तपास केला असता कळाले की दोन कारणांमुळे आमची रेल्वे उशिरात धावते आहे . पहिले कारण म्हणजे धुक्यामुळे रेल्वे चालकाला ट्रॅक आणि सिग्नल नीट दिसत नसल्यामुळे रेल्वे उशिरा धावत आहेत .दुसरे कारण म्हणजे वंदे भारत रेल्वे वेळेत धावावी यासाठी आमच्या रेल्वेला थांबवून ठेवण्यात आलेले आहे .खरे तर रेल्वेने मंत्रालयाने सर्वच रेल्वे वेळेवर धावतील याची खात्री काळजी घ्यायला हवी . एका रेल्वेसाठी दुसऱ्या रेल्वेला थांबवून ठेवणे योग्य नाही .
सोनू वावांगचुक यांनी मोबाईल द्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक प्रश्न विचारला की भारतात रेल्वेला धुक्यामुळे उशीर होतो तसा उशीर चीनमध्ये देखील होतो का ?या प्रश्नाचे उत्तर मोबाईल द्वारे मिळाले की भारतात धुक्यामुळे तीन-चार किंवा अधिक तास रेल्वे उशिरा धावतात . मात्र चीनमध्ये काही मिनिटांचाच उशीर होतो .हे उदाहरण देऊन वांगचूक म्हणाले की सध्याचा काळ नवतंत्रज्ञानाचा आहे . तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग आणि भारत पुढे गेलेला आहे .आपण मानवरहित अवकाशयान पाठवितो, मानव रहित विमाने आहेत .मात्र रेल्वे चालकाला धुक्यातून रस्ता दिसू शकेल अशी यंत्रणा आपल्याकडे नाही . त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या बाबतीत रेल्वे मंत्रालयाने विचार करायला हवा . हे काही फार नवे, वेगळे तंत्रज्ञान नाही .सर्वच प्रवाशांना प्रवासामध्ये इतका उशीर होणे अभिमानास्पद नाही .