Wednesday, February 12, 2025
Homeकलारंजनव्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या बेनेगलांच्या चित्रपटातील नायिका - लंगरे

व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या बेनेगलांच्या चित्रपटातील नायिका – लंगरे

कोल्हापूर- ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या समग्र चित्रपटांतून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी नायिका प्रखरतेने दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रांतर्गत आयोजित ‘दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बीजभाषक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाच्या संवादशास्त्र विभागाचे डॉ.विश्राम ढोले होते.डॉ. लंगरे म्हणाले की, बेनेगल यांच्या चित्रपटांतील महिलांच्या व्यक्तिरेखा विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या असून स्त्री समस्या त्यांनी स्त्रियांच्याच दृष्टिकोनातून मांडल्या. या चित्रपटांतील महिला व्यक्तिरेखा या आपल्या समस्यांची उत्तरे शोधणाऱ्या खऱ्या ‘नायिका’ असून त्यामुळेच त्या आजच्या काळाशी सुसंगत वाटतात.अध्यक्षीय भाषणात डॉ. विश्राम ढोले म्हणाले की, श्याम बेनेगल यांचे चित्रपट म्हणजे व्यावसायिक व समांतर अशा दोन प्रवाहांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. व्यावसायिक व वास्तविक सिनेमांचा सुंदर मिलाफ त्यांनी कल्पकतेने साकार केला.यावेळी स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. निशा मुडे-पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. चित्रपट समीक्षक सर्फराज मुल्ला यांनी मार्गदर्शन केले. अश्विनी कांबळे यांनी आभार मानले.याप्रसंगी नांदेड विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र गोणारकर, एमजीएम औरंगाबाद विद्यापीठाच्या डॉ. विशाखा गारखेडकर, एफटीआयआय पुण्याचे डॉ.प्रसाद ठाकूर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. चंद्रशेखर वानखेडे, डॉ. अंबादास भासके, डॉ. नितीन रणदिवे, विठ्ठल एडके, दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, शैलेश कोरे व विजय जाधव यांच्यासह संजय घोडावत विद्यापीठ तसेच निटवे महाविद्यालयातील पत्रकारितेची विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments