सोलापूर ः माझ्या आयुष्यात मी जवळपास ३० हजार पुस्तकांचं वाचन केलंय, त्याचा संग्रह केलाय. आता तो सगळा पुस्तकांचा खजिना लोकांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून मी सोलापुरात स्वतःचं सुसज्ज असं ग्रंथालय सुरु करतोय.असे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांनी जाहीर केले आहे .
लोकांनी तिथं यावं, वाचावं, अभ्यास करावा. पुस्तकं घरी देणार नाही. कारण यात फार दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्यात नोबेल पुरस्काराची, बुकर पुरस्काराची जगभरातली पुस्तकं असतील. अशी माहिती अरण्यऋषि पद्मश्री मारुती चित्तमल्ली यांनी दिली. प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने डॉ. सुहासिनी शहा यांनी त्यांचा सन्मान केला त्यावेळी मारुती चित्तमपल्ली यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या त्यावेळी ते बोलत होते.
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात त्यांचा सत्कार करायचा होता पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्याक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. चितमपल्ली यांनी जल, जमीन, जंगल यांची जी आपण हेळसांड केलीय त्याविषयी चिंता व्यक्त केली. बिबटे, वाघ किंवा अन्य जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन जे नुकसान करतायत त्यालाही आपण कारणीभूत आहोत. त्यांना जंगलात खायला मिळत नाही म्हणून ते मानवी वस्तीत येतायत. मी नागझिरा, नवेगाव, मेळघाट इथं काम करत असताना जंगलांच्या भोवताली मोठ्या प्रमाणावर गवत उगवेल याची काळजी घ्यायचो. त्यामुळे हरणं जंगलात राहिली, वाघ बिबट्या जंगलात राहिले,प्रत्येकाचं अन्न तिथं उपलब्ध होतं असे .

चित्तमपल्ली पुढे बोलताना ते म्हणाले की, कुठली झाडं कुठे लावावीत याचं एक वैज्ञानिक कारण आहे. त्यानुसार वृक्षारोपण करावं लागतं. त्याविषयीचं एक पत्रकच मी काढलं आहे. ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पाणी विषयात दखील आपण गंभीर नाही आहोत. पाण्याचं योग्य नियोजन करणं फार गरजेचं आहे. असेही चित्तमपल्ली म्हणाले.
त्यांच्याशी झालेल्या गप्पांच्या ओघात आंतरराष्ट्रीय जलतज्ञ माधवराव चितळे यांची आठवण निघाली. त्यावेळी माधवराव चितळे हे फार मोठं व्यक्तीमत्व असल्याचा त्यांनी उल्लेख केला. प्रिसिजन वाचन अभियान उपक्रमाविषयी कौतुक करत ते म्हणाले की, हल्ली लोकांचं वाचन कमी झालंय, तुम्ही सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यावेळी पत्रकार दशरथ वडतिले, माधव देशपांडे आदि उपस्थित होते.