आलेल्यांची नावे जाहीर करण्याचे आवाहन
वर्धा – सेवाग्राम आश्रम मध्ये माओवाद्यांचे येणे जाणे आहे असा आरोप एक आमदारांनी केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेदनाला दूधवाला दिला हे दुःखदायक आहे असे म्हणत गांधीवाद्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे .आश्रमात कोणते माओवादी आले होते याची जाहीर यादी जाहीर करत असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे .
गांधी वाद्यांच्या त्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री असे विधान करतात हे अतिशय दुःखद आहे .महात्मा गांधी यांनी आम्हाला मानवतेची मूल्यं, अहिंसा ,जबाबदार प्रशासन आणि सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे राहण्याची शिकवण दिली आहे .त्यानुसार आम्ही सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे असतो .कालही आम्ही हुकूमशाही च्या विरोधात होतो आजही आहोत आणि उद्याही हुकूमशाहीच्या विरोधातच राहू . मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे देशभरातील गांधीवादी संस्थां बाबत लोकांच्या मनामध्ये विनाकारण शंका आणि गैरसमज निर्माण होण्याचा धोका आहे .
मुख्यमंत्र्यांनी त्या ६२ संघटना असल्याचे जाहीर केले आहे .मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे या संघटनांची संपूर्ण नावे आणि माहिती असेल याची आम्हाला खात्री आहे .ती यादी जनतेसाठी जाहीर केले असती तर ते त्यांच्या पदाला शोभले असते .त्यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम ही दूर झाला असता .
सेवाग्राम आश्रमात माओवाद्यांचे येणे जाणे आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्याकडे ती माहिती असेलच .. त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी अन्यथा तात्काळ आपले म्हणणे मागे घ्यावे असे आवाहनही या निवेदनात करण्यात आलेले आहे .
या निवेदनावर चंदन पाल अध्यक्ष सर्व सेवा संघ सेवाग्राम यांच्यासह प्रभाकर पुसदकर , आशा बोथरा ,विभा गुप्ता , ॲड काकडे यांच्यासह पंधरा गोधीवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत .