मुंबई – महाराष्ट्रातील पाच समुद्रकिना-यांना ‘ब्लू फ्लॅग पायलट’चा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रातील पाच समुद्र किनारे सपूर्ण जगात प्रसिद्ध होणार आहेत. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे.
या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिना-यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघरमधील पारनाका समुद्र किना-याचाही यात समावेश आहे. राज्यातील 12 समुद्र किना-यांचे ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी अर्ज गेले होते त्यातील या पाच किना-यांना पायलट म्हणून संधी मिळाली आहे.
महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. महाराष्ट्रात अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. हे समुद्र किनाऱ्या गोव्यासह परदेशातील समुद्र किनाऱ्यांना टक्कर देतात. राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘ब्लू फ्लॅग मानांकन’ (Blue-Flag) प्रमाणपत्र मिळवण्याचा मान पटकावला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
जागतिक पातळीवर स्वच्छ, आणि सुंदर समुद्र तसेच पर्यावरण पुरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिले जाते. डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन या संस्थे मार्फत हे मानांकन दिले जाते. ३३ निकषांचे मूल्यमापन करून ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा मिळतो. पर्यावरण शिक्षण, जल गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसेच सेवा सुरक्षा, सेवा या घटकांचा देखील यात समावेश असतो. कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांमार्फत या मानांकनासाठी अर्ज करण्यात आले होते. ज्याची पडताळणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात करण्यात आली होती. या पडताळणी नंतरच राज्यातील पाच किनाऱ्यांना हे मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी देशातील १३ समुद्र किनाऱ्यांना हे मानांकन मिळाले होते . परंतु त्यात राज्यातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नव्हता.
र या मानांकनामुळे महाराष्ट्रातील किनारे जागतिक पर्यटन नकाशावर अगदी ठळकपणे झळकतील, तसेच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल,” असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला आहे. श्रीवर्धनचा समुद्र किनारा नगर परिषदेने विकसित केला. निसर्ग चक्रीवादळात या समुद्र किनाऱ्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र राज्यसरकारकडून निधी आणत आदिती तटकरेंनी या समुद्र किनाऱ्याचे नव्याने सुशोभिकरण करून घेतले होते. समुद्र किनाऱ्या शाश्वत आणि पर्यावरण पूरक अश्या विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते.