मुंबई -शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमास ४८३ बीएड महाविद्यालयात एकूण ३६६९८ जागांपैकी ३३ हजार ८७७ जागावर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ९२.३१ एवढी आहे. तर सलग तिसऱ्या वर्षी मुलींची संख्या जास्त असून यावर्षी ७३.०७ % मुलीनी प्रवेश घेतला .
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदवी शिक्षणशास्त्र प्रवेशाला २५ जून २०२५ पासून सुरुवात झाली होती व ही प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरु होती. हि प्रवेश प्रक्रिया चार महिने सुरु होती. यात प्रवेशाच्या तीन फेऱ्या झाल्या असून संस्थात्मक फेरीसह चार फेऱ्यात हे प्रवेश झाले आहेत. महाराष्ट्रातील ४८३ पदवी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात हे प्रवेश झाले आहेत. मागील तीन वर्षाची आकडेवारी पहिली असता पदवी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षी वाढत आहे.
२०२३ -२४ मध्ये ८७.७३ %, २०२४-२५ मध्ये ९०.७६ % तर २०२५-२६ मध्ये ९२.३१ % प्रवेश झाले आहेत. यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ९५.५३ % प्रवेश झाले आहेत. यात एकूण ३४१७० जागा कॅप अंतर्गत होत्या त्यापैकी ३२६४३ जागेवर प्रवेश झाले आहेत. इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गामध्ये मात्र यावर्षी ४६.६७ % प्रवेश झाले आहेत. म्हणजे ५३.३३ % जागा रिक्त राहिल्या आहेत. एकूण २५२८ जागांपैकी ११८० जागा भरल्या असून १३८० जागा रिक्त राहिल्या आहेत. सलग तिसऱ्या वर्षीही मुलींची संख्या जास्त पदवी शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमात मागील तिन्हीही वर्षी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आढळली आहे
शिक्षणशास्त्र (बीएड) क्षेत्रात करियर करण्याकडे विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. यावर्षी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ९२ % विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यावर्षी प्रवेशाच्या चार फेऱ्या झाल्या व ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडली असे दिलिप सरदेसाई , ( भा.प्र से. ) आयुक्त , राज्य सीईटी कक्ष यांनी सांगितले .

