Monday, December 1, 2025
Homeशिक्षणबातम्याडॉ . आंबेडकर विचारांबाबत सोलापूर विद्यापीठात जागतिक परिषद

डॉ . आंबेडकर विचारांबाबत सोलापूर विद्यापीठात जागतिक परिषद

सोलापूर -‘ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .

दिद्यापीठातीत सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्यातर्फे ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 4 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अरब- अमेरिकन विद्यापीठाचे डॉ. अयमान इसुफ विशेष पाहुणे असणार आहेत, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन: डॉ.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजीत करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. गौतम कांबळे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सामाजिक न्याय, समानता, लोकशाही, अर्थकारण आणि राष्ट्रनिर्माणाचे विचार आज केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून, ते जागतिक स्तरावर मानवमुक्ती आणि प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. याच विचारांना वैश्विक स्तरावर अधिक दृढ करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विदेशातील आणि भारतातील देशातील विविध राज्यांतून 400 हून अधिक संशोधक, विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. विविध परिषदेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांच्या विविध पैलूंवर 150 संशोधन पेपरचे सादरीकरण आणि गटचर्चा होणार आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि कायदेशीर क्षेत्रातील डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचे विश्लेषण या सत्रांमध्ये होईल. या परिषदेत 4 डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वाचे सत्र ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार’ या विषयावर डॉ. विजय खरे मांडणी करणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रीवादी, मानवी हक्क आणि मानवी स्वातंत्र्यासाठी विषयक विचार या विषयावर डॉ. सुमित म्हसकर, भदंत धम्मनाग, डॉ. प्रकाश पवार, डॉ.वैशाली प्रधान आदी मांडणी करणार आहेत. दुसर्‍या दिवशी 5 डिसेंबर रोजी आंबेडकरवादी प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन: शिक्षण आणि आर्थिक न्याय या विषयावर प्रशांत रणदिवे, डॉ. त्रिनाध, डॉ. प्रशांत बनसोडे सविस्तर मांडणी करणार आहेत. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता एक चळवळ : मूकनायक ते प्रबुद्ध भारत या विषयावर डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. रवींद्र चिंचोलकर विषयाची मांडणी करणार आहेत. दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी डॉ. जयभीम शिंदे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या समारोपाला माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिका येथील टेक्सास विद्यापीठातील डॉ. स्कॉट स्ट्राऊड मार्गदर्शन कणार आहेत.ही आंतरराष्ट्रीय परिषद भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वर्तमानकालीन प्रासंगिकतेवर भर देईल. त्यांच्या विचारांची जागतिक स्तरावर होणारी स्वीकारार्हता आणि त्यांचे बहुआयामी दृष्टिकोन या परिषदेत नव्याने मांडले जातील. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वव्यापी विचारांचा अभ्यास करण्याची आणि त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक व राष्ट्रीय विकासाला चालना देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर अभ्यास करणारे संशोधक, विचारवंत, पत्रकार, विद्यार्थी आणि सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. तेजस्विनी कांबळे, प्रा. सागर राठोड, डॉ. अंबादास भास्के, प्रा. विठ्ठल एडके उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments