Friday, December 12, 2025
Homeअर्थकारणमेक्सिको सरकारची भारताला अडचणीत आणणारी नववर्ष भेट

मेक्सिको सरकारची भारताला अडचणीत आणणारी नववर्ष भेट

भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ

मेक्सिको सिटी – अमेरिकेने भारतावर बहुतेक वस्तूंवर ५० टक्के शुल्क लावल्यानंतर चार महिन्यांनी, मेक्सिकोने भारत आणि चीनसह आशियाई देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या निवडक उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताला अडचणीत आणणारी ही नववर्ष भेट ठरणार आहे .

राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेले हे शुल्क १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.मेक्सिकन दैनिक ‘एल युनिव्हर्सल’नुसार, मेक्सिकोने ऑटो पार्ट्स, हलक्या गाड्या, कपडे, प्लास्टिक, स्टील, घरगुती उपकरणे, खेळणी, कापड, फर्निचर, पादत्राणे, चामड्याच्या वस्तू, कागद, पुठ्ठा, मोटरसायकल, अॅल्युमिनियम, ट्रेलर, काच, साबण, परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या वस्तूंवर शुल्क लावले आहे.ज्या देशांचा मेक्सिकोसोबत व्यापार करार नाही, जसे की भारत, दक्षिण कोरिया, चीन, थायलंड आणि इंडोनेशिया, त्या देशांवर याचा परिणाम होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments