नवी दिल्ली – केवळ पंडित नेहरुंचेच नव्हे तर महात्मा गांधीचेही नाव आम्हाला नको हे भाजपप्रणीत केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या नावातून महात्मा गांधी यांचे नाव काढून टाकलेले आहे .
. रोहयो योजना बंद करून त्याजागी नदी योजना आणल्या ने नाव बदलले असे भाजप सरकारचे म्हणणे आहे
या योजनेतील महात्मा गांधी हे नाव वगळून त्याऐवजी पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना केले जाण्याची चर्चा होती . मात्र आता योजनेचे नाव बदलले त्यात महात्मा गांधी आणि पूज्य बापू यापैकी कशाचाच उल्लेख नाही .
आपण ज्याला रोजगार हमी योजना (रोहयो) म्हणतो त्या योजनेचे नाव आजवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोगार योजना असे होते . मात्र आता केंद्र सरकारने या योजनेचे नावच बदलून टाकले आहेत ।
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून ग्रामीण रोजगारासाठी एक नवीन कायदा आणणारे विधेयक — विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) (व्हीबी-जी आरएएम जी) विधेयक, २०२५ — लोकसभेत सादर केले जाणार आहे.हे विधेयक सोमवारी जारी केलेल्या लोकसभेच्या कामकाजाच्या पुरवणी यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे की, मनरेगा कायद्याने गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण कुटुंबांना हमीपूर्वक मजुरी-रोजगार प्रदान केला आहे.तथापि, “सामाजिक सुरक्षा हस्तक्षेपांच्या व्यापक व्याप्तीमुळे आणि प्रमुख सरकारी योजनांच्या संतृप्त-केंद्रित अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात झालेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर, त्यात आणखी बळकटी आणणे आवश्यक झाले आहे,” असे ते म्हणाले.

