पुणे– ‘दिवस उद्याचा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा ‘
हे गाणे सर्वांच्याच आवडीचे आहे. पण या रविवारच्या सुटीवर संकट येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोमवार ते शनिवार हे शाळेचे , कॉलेजचे , नोकरीचे सहा दिवस संपून आठवड्याची हक्काची रविवारची सुटी कधी येते याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहात असतो. येत्या रविवारी काय करायचे ? ते आपण आधीच ठरवून ठेवलेले असते. कोणाला प्रेयसीला भेटायचे असते, कोणाला पार्टी करायची असते, कोणाला दिवसभर झोपून रहायचे असते. प्रत्येकाचे नियोजन वेगळे असते .
आता हा बिचारा रविवारच संकटात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . या वाराला आता धार्मिक संकटात टाकायचे काही राजकारणी लोकांच्या डोक्यात शिजू लागले आहे. रविवार हा तर ख्रिश्चनांचा सुटीचा दिवस , तोआपण कायम का ठेवायचा ? सुटीचा वारच आता बदलूया अशी मोहीम सुरु झाली आहे.
रविवार सुटीचा इतिहास
इ .स .पूर्व 321 मध्ये, रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांनी सात दिवसांचा आठवडा अधिकृत रोमन आठवडा असल्याचे फर्मान काढले आणि ‘रविवार’ ही सार्वजनिक सुट्टी बनवली. त्यांनी त्यावेळी रविवारच्या संदर्भात पहिला नागरी कायदा सादर केला आणि आज्ञा दिली की त्या दिवशी (रविवार) सर्व काम बंद करावे, आवश्यक असल्यास शेतकरी काम करू शकतील. अलेक्झांडर द ग्रेटने ग्रीक संस्कृतीचा प्रसार नजीकच्या पूर्वेपर्यंत, भारतापर्यंत सुरू केला तेव्हा, सात दिवसांच्या आठवड्याची संकल्पना जगभर पसरली .
रविवार सुटीसाठी सात वर्षे लोखंडे यांचा संघर्ष
पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि भारताचा बहुतांश भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. मिल व इतर कामगारांकडून इंग्रज अधिकारी आठवड्यातील सातही दिवस काम करत असत. त्यांना कोणतीही सुट्टी नव्हती परंतु ब्रिटिश अधिकारी मात्र रविवारी प्रार्थने करीता चर्च मध्ये जात असत. त्यामुळे भारतीय कामगारांची मोठी पिळवणूक होत होती. महात्मा फुले यांचे अनुयायी आणि कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी हे लक्षात घेऊन आठवड्यातून एक दिवस आम्हाला देश आणि समाजसेवेकरिता मिळायला हवा अशी मागणी केली. रविवार हा हिंदू देवता खंडेराया यांचा दिवस असल्यामुळे रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती. इंग्रज सरकारने ती मागणी धुडकावून लावली. मात्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी या मागणीसाठी सतत सात वर्षे संघर्ष संघर्ष सुरुच ठेवल्याने इंग्रज अधिका-यांना ती मागणी मान्य करावी लागली. १० जून १८९० ला ब्रिटिश सरकारतर्फे गव्हर्नर जेनेरल लॉर्ड ऑकलंड याने भारतात रविवारचा दिवस सुट्टीचा असे घोषित केले. नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही .रविवारची हक्काची सुटी भारतीयांना मिळवून दिली . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही सुटीचा दिवस बदलण्याचा विचार कोणाच्या मनात आला नाही.
पाच दिवसाचा आठवडा
बेल्जियम, न्यूझीलंड, जापान, आयर्लंड , स्कॉटलँड , स्पेन आणि संयुक्त अरब इमिराती या आठ देशात तर कर्मचा-यांना चारच दिवस काम करावे लागते. दर आठवड्याला तीन दिवसांचा सुटीचा आनंद त्यांना घेता येतो. हे देश प्रगत असल्याने या देशांना ते परवडते.
अनेक देशात साप्ताहिक सुटीचे वार भिन्न
जगभरात रविवार हाच साप्ताहिक सुटीचा दिवस असतो असे आपणास वाटत असेल तर ते मात्र खरे नाही. काही देशात सुटीचे वार वेगळे आहेत आणि रविवार मात्र कामाचा दिवस आहे.रविवार कामाचा दिवस असलेल्या देशात अफगाणिस्तान (रविवार-गुरुवार), अल्जेरिया (रविवार-गुरुवार), बहरीन (रविवार-गुरुवार), इजिप्त (रविवार-गुरुवार), इराक (रविवार-गुरुवार), जॉर्डन (रविवार-गुरुवार) -गुरुवार), कुवेत (रविवार-गुरुवार), लिबिया (रविवार-गुरुवार), मालदीव (रविवार-गुरुवार), नेपाळ (रविवार-शुक्रवार), ओमान (रविवार-गुरुवार), कतार (रविवार-गुरुवार), सौदी अरेबिया (रविवार-गुरुवार), सुदान (रविवार-गुरुवार), सीरिया (रविवार-गुरुवार) इत्यादी देशांचा समावेश आहे. त्यामुळे या देशात कामानिमित्त जात असाल तर सुट्यांचे दिवस लक्षात घेऊन नियोजन करा.
भारतातील रविवारची सुटी धोक्यात
भारतात रविवारी असलेली साप्ताहिक सुटी ख्रिश्चन धर्माशी जोडलेली आहे, त्यामुळे आम्हाला ती मान्य नाही अशी मोहीम काहींनी सुरु केली आहे. त्यांनी भारतातील रविवार सुटीचा संबंध नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी निगडित आहे हे लक्षात घ्यावे.