पॅरिस – ऑलिंम्पिकच्या 230 वर्षाच्या इतिहासात प्रथमच यात सहभागी होणा-या महिला आणि पुरुष खेळाडूंची टक्केवारी समसमान 50 टक्के झाली आहे. ऑलिंम्पिक सहभागात स्री-पुरुष समानता येण्यास तब्बल 230 वर्षे लागली. मात्र आता निर्माण झालीली समानता हा नव्या युगाचा शुभ संदेश आहे.
जगातील सर्वात जुनी स्पर्धा म्हणून ऑलिंम्पिक ऑलिंम्पिकची ओळख आहे. यंदा ऑलिंम्पिक साठी पॅरिसमध्ये भव्यदिव्य आयोजन केले जात आहे.पॅरिस ऑलिंपिंक 2024 ही स्पर्धा 26 जुलैपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा म्हणजे जगभरातील करोडो क्रीडा प्रेमींसाठी एक उत्सवच असतो. या खेळाची आतुरतेने वाट पाहत असतात. पॅरीसमधील सीन नदीच्या तिरावर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार असल्याने विशेष उत्सुकता आहे.
पहिल्यांदा ऑलिंम्पिक स्पर्धा 1896 साली भरविण्यात आल्या , त्यात 1000 टक्के खेळाडू पुरुष होते, महिलांचे प्रमाण शून्य टक्के होते. नंतर झालेल्या प्रत्येक ऑलिंम्पिक मध्ये महिला खेळाडूंची संंख्या वाढतच गेली. 1900 मध्ये 2.2 टक्के , 1904 मध्ये 0.9 टक्के, 1908 मध्ये 1.8 टक्के, 1912 मध्ये 2 टक्के,1920 मध्ये 2.4 टक्के, 1924 मध्ये 4.4 टक्के, 1928 मध्ये 9.6 टक्के , 1932 मध्ये 9 टक्के 1936 मद्ये 8.3 टक्के असा सहभाग होता. दुस-या महायुध्दामुळे 12 वर्षे ऑलिंम्पिक स्पर्धा झाल्या नाही.
दुस-या महायुध्दानंतर 1948 साली ऑलिंम्पिक स्पर्धा झाल्या त्यात महिला खेळाडूंची टक्केवारी 9.5 टक्के होती. नंतर 1952 मध्ये 10.5 टक्के, 1956 मध्ये 13.3 टक्के. 1960 मध्ये 11.4 टक्के, 1964 मध्ये 13.2 टक्के होती.
1968 साली झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धांमध्ये 14.2 टक्के महिला खेळाडू होत्या. 1972 साली 14.6 टाके महिला खेळाडू होत्या. 1976 नंतर महिला खेळाडूंचा सहभाग ब-यापैकी वाढू लागला. 1976 मध्ये 20.6 टक्के, 1980 साली 21.5 टक्के, 1984 साली 23 टक्के, 1988 साली 26.1 टक्के , 1992 साली 28.8 टक्के, 1996 साली 34 टक्के, 2000 साली 38.7 टक्के , 2004 साली 40.7 टक्के , 2008 साली 42.4 टक्के, 2012 साली 44.2 टक्के, 2016 साली 45 टक्के , 2020 साली 48.8 टक्के आणि यावर्षी 2024 साली 50 टक्के.