Thursday, November 21, 2024
Homeबातम्याकंपन्यांमध्ये कार्यरत महिलांच्या प्रगतीत बाधा

कंपन्यांमध्ये कार्यरत महिलांच्या प्रगतीत बाधा

मुंबई – भारतात कार्पोरेट कंपन्यामध्ये काम करणाऱ्या महिलांना प्रगतीत असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो .

भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात  काम करणाऱ्या 90 टक्के महिला आव्हानात्मक प्रकल्पात काम करण्यासाठी  आपली कौशल्ये वाढविण्यास उत्सुक आहेत ,मात्र यापैकी 42 टक्के महिलांना त्यांच्याविषयी कंपनीत असलेल्या पूर्वग्रहामुळे अडचणी येतात असे सर्वेक्षणात आढळले आहे .

कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे शारीरिक स्वरूप, वय, त्या आई असणे या सारखी कारणे महिला कर्मचाऱ्यांविषयी होणाऱ्या पक्षपातास कारणीभूत आहेत .

व्यावसायिक सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एओन (Aon) या संस्थेने 560 पेक्षा अधिक कंपन्यांमधील 24 हजार महिलांचे सर्वेक्षण केले . या सर्वेक्षण अहवालाचे शीर्षक  ‘2024 Voice of Women Study India’ असे आहे .या सर्वेक्षण वर आधारित असलेले निष्कर्ष या कंपनीने जाहीर केले आहेत त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे .

या सर्वेक्षणात पुढे असे म्हटले आहे की 37% महिलांना कामाच्या ठिकाणी असंवेदनशील वर्तनाचा अनुभव आला . 1400 पेक्षा अधिक (सहा टक्के) महिलांना  किमान एकदा तरी लैंगिक छळाचा सामना करावा लागला . त्यापेक्षा फक्त निम्म्या कमी महिलांनी या संदर्भात आपल्या व्यवस्थापनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे .

कंपनीमध्ये काम करणाऱ्या 47% महिलांना आपल्या नोकरी विषयी अनिश्चितता वाटते . दोन वर्षाच्या आत आयटी कंपनी सोडावी लागेल असे सतत जाणवत असल्याचे या महिलांनी सांगितले .काम करण्याच्या ठिकाणी सर्वसमावेशक संस्कृतीत असलेला अभाव हे आमचे प्रमुख कारण आहे असे या महिलांनी स्पष्ट केले .महिला कर्मचाऱ्यांबाबत असणारा पक्षपातीपणा किंवा वेतनातील असमानता यासारखे करणे याला कारणीभूत असल्याचे या सर्वेक्षणामध्ये दिसून आले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments