Wednesday, October 2, 2024
Homeशिक्षणबातम्याउजनीतील पाणीसाठा प्लसमध्ये

उजनीतील पाणीसाठा प्लसमध्ये

यावर्षी धरण शंभर टक्के भरण्याची आशा पल्लवित

सोलापूर – सोलापूर जिल्हयासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमा नदीवरील उजनी धरणाातील साठ्यात मोठी वाढ झाली असून 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता धरण उणे पाणी पातळी मधून अधिक मध्ये (प्लसमध्ये ) आले आहे .सध्या अधिक 0.13 टक्के पाणी पातळी आहे .

सोलापूर जिल्हयातील शेती, उद्योग क्षेत्रासाठी तसेच नागरिकांसाठी ही आनंद वार्ता आहे. यावर्षी उजनी धरण शंभर टक्के भरेल असा विश्वास यामुळे वाढला आहे .

23 जुलै 2024 पर्यंत उजनी धरणातील विसर्ग 8 हजार क्युसेक्स किंवा त्यापेक्षा कमी होता. त्यामुळे उजनी धरण 31 जुलैपर्यंत उणे पातळी मधून अधिक पातळीमध्ये मध्ये येईल असे वाटत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील धरण क्षेत्रात भरपूर पऊस पडल्याने कळमोडी, खडकवासलाही धरणे 100 टक्के भरली, त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाला. 25 जुलै 2024 च्या रात्रीपर्यंत हा विसर्ग 1 लाख 50 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वाढला . त्यामुळे धरण गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधीच वजा पातळीतून अधिक पातळीत आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास 1 ऑगस्टपर्यंत उजनी धरणातील पाणीपातळी अधिक 30 टक्केंपर्यंत जाईल असे अपेक्षित आहे.

उजनी धरणाचा अभ्यास असणारे पत्रकार सिध्देश्वर शिंदे यांचा व्हिडिओ सोबत दिला आहे .

साठ टक्के नवे पाणी

गतवर्षी 2023 मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने उजनी धरण 60 टक्क्यांपर्यंतच भरले. त्यामुळे यावर्षी 21 जानेवारी 2024 रोजीच धरणातील जिवंत पाणीसाठा संपला. आणि मे अखेरीस धरणाने विक्रमी वजा पातळी गाठली. ती लक्षात घेता उजनी धरणात 60 टक्के नवे पाणी आले आहे असे म्हणावे लागेल. आता कोठे धरणाची पाणीपातळी अधिकमध्ये आली आहे. 100 टक्के धरण भरण्यास अजून मोठा पल्ला गाठावयाचा आहे.

सोलापूर जिल्हयात चांगला पाऊस

महाराष्ट्रात मान्सून सरासरी 7 जूनला येतो. मात्र सोलापूर जिल्हयाला दरवर्षी मान्सूनची खूप प्रतीक्षा करावी लागते. जून 2024 ने मात्र सोलापूर जिल्हयाला सुखद धक्का दिला आहे. 6 जून रोजीच सोलापूर जिल्हयात मान्सूनचे आगमन झाले . तेव्हापासून चार दिवस नित्यनियमाने पाऊस सोलापूर जिल्हयात बरसला. जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली . त्यानंतरही जुलै महिनयात सोलापूर जिल्हयात पाऊस येतच राहिला. त्यामुळे कधी नव्हे ती 25 जुलैलाच सोलापूर जिल्हयात पडलेल्या पावसाची टक्केवारी 200 टक्केपेक्षा .अधिक झाली. बार्शीसह काही तालुकात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्हयात चांगला पाऊस

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments