Thursday, October 3, 2024
Homeपर्यावरणऑक्राच्या गोष्टी

ऑक्राच्या गोष्टी

पहिल्या महायुद्धाच्या (World War 1 ) च्या आसपास टेक्ससमधल्या जॉर्जटाऊन गावात हेन्री कॉम्प्टन नावाचा मुलगा राहायचा. लई उचापती. त्याला वडलांनी शेतात कपाशी लावायला सांगितली तर त्याने भेंडी लावली. शेतभर भेंडी. अनेक एकर. भेंडीमध्ये पैसा होता 🤑. 

त्याने इतकी इतकी इतकी भेंडी लावली आणि मग इतका पाऊस झाला की भेंडी गावभर पसरली. भाव तर पडलेच पण सगळीकडे भेंडीच भेंडी झाली. सगळे गाव वेडे झाले. पोरगा घाबरून सैन्यात पळून झाला 😆 

याचे नाव झाले ऑक्रा. इंग्रजीत भेंडीला ऑक्रा म्हणतात म्हणून याचे नावच भेंडी झाले 😸

पुढे ऑक्रा खूप शुर वगैरे निघाला. १९१८-१९ मध्ये तो अमेरिकन सैन्याबरोबर युरोपमध्ये गेला आणि युद्धात फ्लॅडर्स फिल्ड (Flanders Field ) बघितले बेल्जियम मधले. शेकडो सैनिकांना तिथे पुरले होते आणि त्यावर लाल लाल पॉपी फुलल्या होत्या. मैल मैल लाल पॉपी ( poppy. )

ओक्राने यातल्या काही बिया तंबाखूच्या पिशवीत भरल्या आणि आईला पाठवल्या दूर समुद्रापलीकडे. आईने त्या आपल्या बागेत लावल्या. परसात लावल्या. ओक्राच्या हाताचा गुण असा की भेंडी सारखीच ही पॉपी (poppy )पण गावभर पसरली. 

शंभर वर्ष होऊन गेली. दर एप्रिल – मे मध्ये जॉर्जटाऊन लाल लाल होते. दूरदूरहून माणसं ऑक्राने रुजवलेली फुलं बघायला येतात. कोपऱ्यावर बसून जुने लोक ऑक्राच्या गोष्टी सांगतात 😊

(परिणिता दांडेकर यांच्या फेसबुक भिंतीवरून साभार )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments