जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ; 206 देशांचा सहभाग
पॅरीस – जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक -2024 ची फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 24 जुलै 2024 पासून होणार आहेत . या स्पर्धांसाठी पॅरीस नगरी सज्ज झाली आहे .यात 206 देशांचे 10 हजार 500 खेळाडू एकंदर 32 क्रीडा प्रकारांच्या 329 स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत .
आंतरराष्ट्रीयऑलिंम्पिक असोसिएशन दोन प्रकारच्या ऑलिंम्पिक स्पर्धा आयोजित करते . दर चार वर्षांनी या स्पर्धा होतात .समर (उन्हाळी ) ऑलिंम्पिक आणि विंटर ( हिवाळी) ऑलिंम्पिक अशी त्यांची नावे आहेत . समर ऑलिंम्पिक स्पर्धां अधिक महत्वाची मानली जाते कारण यात जगातील बहुतांश देश सहभागी होतात . 2020 साली टोकियो (जापान ) मध्ये समर ऑलिंम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2024 मध्ये या स्पर्धा फ्रान्समध्ये पॅरीसला होत आहेत . समर ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी लीप वर्षात ( उदा 2000,2024, 2028 )आयोजित केल्या जातात . विंटर ऑलिंम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात . 2022 मध्ये विंटर ऑलिंम्पिक स्पर्धा झाल्या आहेत त्यांना देशाचे खेळाडू सहभागी झाले होते . लीप वर्षानंतर दर दोन वर्षांनी विंटर ऑलिंम्पिक स्पर्धा होतात ( उदा . 2022, 2026, 2030 ) .
शंभर वर्षांनी पॅरीसमध्ये पुन्हा समर ऑलिंम्पिक
पॅरीसमधे 1924 साली समर ऑलिंम्पिक स्पर्धांचे आयोजन झाले होते .त्यानंतर शंभर वर्षांनी 2024 मध्ये पॅरिस येथे समर ऑलिंपिकचे आयोजन होत आहे .या स्पर्धेचे उदघाटन थाटात होणार आहे. प्रथमच एखाद्या स्टेडियम ऐवजी पॅरीसमधील सीन नदीच्या तीरावर या स्पर्धेचा उदघाटन समारंभ होणार आहे . दिनांक 24 जुलै 11 ऑगस्ट 2024 दरम्यान वीस दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत .
ऑलिंम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याची फ्रान्सची ही तिसरी वेळ आहे आतापर्यंत 1900, 1924 आणि 2024 मध्ये फ्रान्सने ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले आहे . याशिवाय फक्त इंग्लंडने तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान मिळवला आहे .इंग्लंडने 1908, 1948 आणि 2012 या वर्षात ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते .
ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात
पहिली ऑलिम्पिक स्पर्धा इ.स.पूर्व 776 मध्ये ग्रीसमधील ऑलिंपिया येथे झाली. नंतर दर चार वर्षांनी 12 शतके ही स्पर्धा आयोजित केली गेली. ऑलिम्पिया हे एक पवित्र क्षेत्र होते ज्यात ऑलिव्ह वृक्ष लागवड होत असे .
राजाने घातली आलिंंम्पिकवर बंदी
इ.स. पूर्व 393 मध्ये, रोमन सम्राट थियोडोसियस I याने धार्मिक कारणांसाठी ऑलिम्पिक खेळांवर बंदी घातली आणि दावा केला की ते मूर्तिपूजकतेला प्रोत्साहन देतात.
दीड हजार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धांचे पुनरुज्जीवन
तब्बल १५०३ वर्षे या स्पर्धांचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही.ग्रीसमधील अथेन्स येथे 1896 मध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले.1894 मध्ये, बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ची स्थापना केली, ज्यामुळे 1896 मध्ये अथेन्समध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिकचे आयोजन झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ही ऑलिंपिक चळवळीची प्रशासकीय संस्था आहे डी कौबर्टिन, एक फ्रेंच शिक्षक आणि इतिहासकार होते. ऑलिम्पिक स्पर्धेचा वापर करुन क्रीडा शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय शांतता वाढवण्यासाठी करण्याची त्यांची इच्छा होती. . डी कौबर्टिन यांनी खेळांमध्ये हौशी स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग तसेच सांस्कृतिक समज आणि राष्ट्रांमधील सौहार्दाची भावना वाढवण्यासाठीचा मार्ग म्हणून या स्पर्धा सुरु करण्यास पुढाकार घेतला .
फ्रायजेस ऑलिंम्पिक स्पर्धेचा शुभंकर
फ्रायजेस हा ऑलिंम्पिक स्पर्धेचा शुभंकर आहे. हा केवळ टोपीचा प्रकार नाही नाहीत; ते फ्रान्सच्या इतिहासात त्याला खूप महत्त्व आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून क्रांतिकारकांनी टोपीची शैली स्वीकारली होती आणि तेव्हापासून ती एक राष्ट्रीय महत्वाची गोष्ट आहे. त्याच टोपीचे प्रतीक या ऑलिंम्पिकसाठी शुभंकर म्हणून स्वीकारले आहे.
ब्रेकडान्स या क्रीडाप्रकाराचा नव्याने समावेश
पॅरीसमध्ये सुरु होणा-या स्पर्धांमध्ये ब्रेकिंग ( ब्रेकडान्स ) या क्रीडाप्रकाराचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. ब्रेकिंग हा ब्रेकडान्सिंगचा एक स्पर्धात्मक प्रकार आहे ज्यामध्ये फूटवर्क आणि ॲथलेटिक हालचाली जसे की बॅक किंवा हेड स्पिन यांचा समावेश होतो. तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, शैली, वेग, सामर्थ्य, ताल आणि चपळता यासह त्यांच्या शिस्तीदरम्यान अनेक निकषांवर विजय निश्चित केला जातो.