Saturday, December 21, 2024
Homeशिक्षणबातम्यागोखले संस्थेचा अभिमत विद्यापीठ दर्जा काढा

गोखले संस्थेचा अभिमत विद्यापीठ दर्जा काढा

कुलपतीपदाचा राजीनामा देताना देबरॉय यांची अनाहूत शिफारस

पुणे – पुणे येथील गोखले संस्था अभिमत विद्यापीठ दर्जा कायम ठेवण्यास योग्यतेची राहिलेली , हा दर्जा काढून घेण्याचा विचार करा असे या संस्थेचे कुलपती विवेक देबरॉय यांनी यूजीसीला पत्राद्वारे कळविले आहे .

यूजीसीने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असेही  कुलपतींनी देबरॉय यांनी या पत्रात लिहिले आहे .डॉ. देबरॉय सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, केंद्र सरकारच्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते. जुलै 2024 मध्येच त्यांची कुलपती पदी नियुक्ती झाली होती.

पुणे येथील ख्यातनाम गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई ) चे कुलपती देबरॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे .मात्र राजीनामा देताना त्यांनी गोखले संस्थेला बदनाम करण्याचा प्रकार योग्य नाही. ही संस्था आता अभिमत विद्यापीठाच्या दर्जाची राहिलेली नाही , त्यामुळे हा दर्जा काढून घ्यावा अशा प्रकारची शिफारस त्यांनी यूजीसीला केली .  देबरॉय यांची ही कृती अयोग्य आणि आश्चर्यकारक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे. गोखले संस्था ही महाराष्ट्रातील नामांकित संस्था आहे .महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार देखील या संस्थेतील तज्ञाचा सल्ला घेऊन अनेक धोरणात्मक निर्णय घेत असते . कुलपती देबरॉय यांच्या एका निर्णयास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली , या एका कारणामुळे, संस्था योग्य दर्जाची राहिली नाही असे देबरॉय यांनी असे म्हणणे त्यांच्या पदाला शोभत नाही.

गोखले संस्था आता अभिमत विद्यापीठाच्या दर्जाची राहिलेली नाही , त्यामुळे हा दर्जा काढून घ्यावा अशा प्रकारची शिफारस कुलपती देबरॉय यांनी यूजीसीला करणे अयोग्य आणि आश्चर्यकारक

मागील  काही महिन्यांपासून ही संस्था अंतर्गत  वादामुळे चर्चेत आली आहे.या संस्थेचे कुलगुरु  डॉ .अजित रानडे यांना पदावरून काढण्याचा निर्णय मागील महिन्यात गोखले संस्थेने घेतला होता .या निर्णयाच्या विरोधात डॉ . रानडे उच्च न्यायालयात गेले .उच्च न्यायालयाने रानडे यांच्या पदमुक्तीच्या निर्णयास स्थगिती दिली .

या स्थगिती आदेशामुळे व्यथित झालेल्या देबरॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . डॉ.रानडे यांना कुलगुरू पदावरून काढण्याच्या माझ्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली . माझ्या आदेशाविरुद्ध हे घडले असल्याने  या परिस्थितीत गोखले संस्थेच्या  कुलपतीपदी राहण्याचा मला नैतिक अधिकार नाही , असे मत व्यक्त करत डॉ . देबरॉय यांनी राजीनामा दिला आहे..

डॉ . रानडे यांच्या पात्रतेबद्दलच्या काही तक्रारी आल्यानंतर कुलपती देबरॉय यांनी तथ्य शोध समिती स्थापन केली होती . समितीच्या निष्कर्षांनुसार डॉ . रानडे यांना कुलगुरु पदावरून हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता .डॉ .रानडे यांनी कुलगुरु पदावरुन हटवण्याचा विरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले की, कुलपती देबरॉय यांनी त्यांना पदावरून हटवताना त्यांच्या विवेकबुद्धीचा वापर केला नाही.

गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरुपदी निवड करताना तज्ञ व्यक्तीला निमंत्रित करून कुलगुरु पदी नियुक्त केले जाते .अशाच पद्धतीने अर्थ तज्ञ अजित रानडे यांची  नियुक्ती झालेली होती . असे असताना त्यांना पदावरून काढले तेव्हाही शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments