महाविद्यालयांनी प्रमाणपत्रे परत पाठविली
मुंबई – विद्यापीठांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका होणे हा प्रकार नेहमीच घडतो मात्र मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठाने चक्क पदवी प्रमाणपत्रांवर विद्यापीठाच्या नावातच करून नवा अध्याय घडवला आहे
विद्यापीठाने प्रदान केलेल्या पदवी प्रमाणपत्राच्या बोधचिन्ह विद्यापीठाचे नाव ‘युनिवर्सिटी ऑफ मुंबई’ ऐवजी ‘युनिवर्सिटी ऑफ मुमाबाई ‘असे झाले आहे .
पदवीधर विद्यार्थ्यांना वितरित करण्यासाठी ही प्रमाणपत्रे विद्यापीठाने महाविद्यालयांकडे पाठवली होती .अनेक महाविद्यालयांनी एकतर प्रमाणपत्रे परत केली आहेत किंवा तसे करण्याच्या प्रक्रियेत आहेत. शहरातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यान ही चूक ‘लाजिरवाणी’ असल्याचे म्हटले आणि प्रमाणपत्र बनावट वाटत असल्याचे सांगितले. “कल्पना करा की विद्यार्थी या कागदपत्रांचा वापर नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी करतात, ही एक आपत्ती आहे”, असे ते म्हणाले. आणखी एका प्राचार्याने सांगितले की विद्यापीठाच्या बोध चिन्हावरील या मोठ्या चुकीमुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो.
विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 2023-24 मध्ये 1.64 लाख विद्यार्थी पदवीधर झाले.पदवी प्रधान समारंभा पूर्वी पदवी प्रमाणपत्रे छापली जातात .त्यामुळे दीड लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे चुकीची प्रमाणपत्र छापली गेली आहेत ती परत घेऊन, नवी प्रमाणपत्रे विद्यापीठाला द्यावी लागतील . यासाठी दुप्पट खर्च हा फार मोठा आहे . विद्यापीठाच्या बोधचिन्ह विद्यापीठाच्या नावात एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते ? एवढी पदवी प्रमाणपत्र छापण्यापूर्वी , त्याचा मसुदा कोणी तपासली किंवा नाही ?यात चूक कोणाची ? आणि हा प्रचंड खर्च कोणाकडून वसूल करायचा ? हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत .
एवढी गंभीर चूक असूनही पदवी प्रदान समारंभ पार पडला आणि पदवी प्रदान करण्यात आल्या. अनेक पदवीधरांनी त्यांच्या पदवीचा वापर नोकरीच्या अर्जांसाठी किंवा विद्यापीठाच्या प्रवेशासाठी आधीच केला आहै
म