Tuesday, January 21, 2025
Homeशिक्षणबातम्याबहिणींवरील कवितांचा गुलदस्ता

बहिणींवरील कवितांचा गुलदस्ता

अक्षरवेलच्या ‘अंकुर’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

धाराशिव -धाराशिव येथे गेल्या २० वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या अंकुर दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन प्रसिद्ध कवत्रित्री पूजा भडांगे यांच्या हस्ते झाले .

मागील सात वर्षांपासून अंकुर या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते . दरवर्षी एका विषयावर आधारित कविता यात असतात . यावेळी बहीण या नात्यावर सुंदर कविता या दिनदर्शिकेत समाविष्ट आहेत .

कवयित्री पूजा भडांगे यां प्रसंगी म्हणाल्या की” मी मुळची बेळगावची असले तरी धाराशिवची सून आहे . अक्षरवेल मंडळ साहित्य विषयक जे विविध उपक्रम राबवत आहे, ते काम खूप प्रशंसनीय आहे. पूजा भडांगे यांनी त्यांच्या काही दर्जेदार कवितांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. .
अक्षरवेल अध्यक्षा डॉ. सुलभा देशमुख यांनी ही दिनदर्शिका विविध नात्यांचे बंध दृढ करणारी आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात अक्षरवेलच्या मार्गदर्शिका डॉ. अनार साळुंके, कार्याध्यक्ष कमल नलावडे, उपाध्यक्ष स्नेहलता झरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष डॉ. रेखा ढगे यांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री फुटाणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मंडळाच्या सचिव अपर्णा चौधरी यांनी करून दिला, आभार प्रदर्शन सारिका उमरकर यांनी केले. स्वागत गीत मोक्षा करवर यांनी सादर केले.
या दिनदर्शिकेत कमल नलावडे, डॉ. अनार साळुंके, विमल नवाडे, किरण देशमाने, प्रा . विद्या देशमुख, ज्योती कावरे,शारदा मेहेत्रे, लता वाघचौरे, सारिका उमरकर, मनिषा पुंड / पर्वत, नेहा महाजन, डॉ. रेखा ढगे यांच्या कविता आहेत.
या दिनदर्शिकेचे मुद्रण व सजावट अपूर्वाई प्रकाशनचे डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments