Monday, October 7, 2024
Homeबातम्याबांगला देशात आरक्षणाच्या विरोधात उद्रेक

बांगला देशात आरक्षणाच्या विरोधात उद्रेक

सार्वत्रिक हिंसाचारात 115 जण ठार, हजारो जखमी

ढाका – भारतातील महाराष्ट्रात आरक्षण हवे म्हणून आंदोलने सुरू आहेत . भारताचा शेजारी असलेल्या बांगला देशात मात्र आरक्षण नको या मात्रणीसाठी सुरु असलेल्या जोरदार आंदोलनात आतापर्यंत 115 जणांचा बळी गेला आहेआणि जखमींची संख्या एक ह्जाराच्यापेक्षा अधिक आहे. संपूर्ण बांगला देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे .

जून 2024 मध्ये बांगला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे तरुण पिढीत संतापाची लाट उसळली . त्या संतापाचे हिंसक निदर्शनात रूपांतर झाले .या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने आणि आतापर्यंत यात 115 जणांचा बळी गेल्याचे वृत्त एएफपी या वृतसंस्थेने दिले आहे हिंसाचाराचे लोण सर्वत्र पसरल्याने  संपूर्ण बांगला देशात संचारबंदी जारी करण्यात आली आहे .

बांगला देशाच्या 1971 च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी भाग घेतला त्यांच्या पाल्यांना 30 टक्के आरक्षण दिले जात होते . या आरक्षणाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्याने 2018 मध्ये बांगला देश सरकारने हे 30 टक्के आरक्षण रद्द केले होते .

जून 2024 मध्ये बांगला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हे 30 टक्के आरक्षण परत कायम करण्याचा निर्णय दिला . या निर्णयानंतर तरुणाईच्या संतापाचा उद्रेक झाला .हे आरक्षण रद्द करावे यासाठी तरूण जागोजागी रस्त्यावर उतरले .या आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यात आतापर्यंत 130 जण मृत्यूमुखी पडले आहेत .

चार वेळा पंतप्रधान म्हणून निवडूण आलेल्या शेख हसीना यांनी स्पेन आणि पोर्तुगाल या देशांचा दौरा बांगला देशातील चिघळलेली स्थिती लक्षात घेता रद्द केला आहे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता  जोर धरू लागली आहे . पोलिस आणि विद्यार्थी यांच्यातील संघर्ष वाढलेला असून अनेक पोलिसही जखमी झाले आहेत .

बांगला देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत .अनेक टीव्ही चॅनल्सच्या सेवाही बंद आहेत .आंदोलकांनी उत्तर ढाक्यातील नारशिंगडी जिल्हयातील तुरुंग फोडल्याने तेथील 800 कैदी पसार झाले आहेत .

पंतप्रधान शेख हसीना या आरक्षणाच्या बाजूने आहेत 1971च्या स्वातंत्रलढ्यात ज्यांनी योगदान दिले त्यांच्याबद्दल सर्वोच्च आदर बाळगण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे .दुसऱ्या बाजूला ठराविक वर्गालाच आरक्षणाचे लाभ मिळत असल्याने आमच्यावर अन्याय होतो आहे असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments