Home बातम्या भारतीय रुपयाची सतत घसरण

भारतीय रुपयाची सतत घसरण

0
112

मुंबई –  भारतीय रुपयाची सतत होत असलेली घसरण चिंताजनक आहे.  29 जुलै 2024 रोजी रुपया  83.74 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र दिवस अखेरीस डॉलरच्या तुलनेत रुपया 83.7275 वर बंद झाला.

मागील दहा वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सातत्याने वाढत गेली आहे. द्हा वर्षात डॉलर रुपयाच्या तुलनेत 23 रुपयांनी महागला आहे. 

201460.95
201566.79
201667.63
201764.94
201870.64
201972.15
202074.31
202175.45
202281.62
2024 (29 जुलै 2024 ))83.72
सतत घसरण

रुपयाची सातत्याने होणारी घसरण चिंताजनक आहे. रुपयाच्या घसरणीचा सर्वाधिक फटका विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. त्यांना फी डॉलरमध्ये भरावी लागते. याशिवाय परदेश प्रवासही महाग झाला आहे.इतर देशांतून होणारी आयात अधिक महाग झाली. परदेशी कर्जाची परतफेड करणे अधिक महाग झाले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरचा भार वाढत आहे.

रुपया घसरण्याची कारणे 

रुपया घसरण्याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. भारत हा तेलाचा मोठा ग्राहक आहे आणि ते बहुतेक परकीय चलन वापरून इतर देशांकडून खरेदी करावे लागते. जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारताला तेवढेच तेल विकत घेण्यासाठी अधिक परकीय चलन खर्च करावे लागते, ज्यामुळे भारतीय रुपयावर दबाव येतो.

 अमेरिका आणि युरोपातील व्याजदर वाढल्याने   गेल्या वर्षभरात, भारतीय बाजारातून मुदत ठेवीच्या रूपात मोठ्या प्रमाणावर भांडवलाचा प्रवाह गुंतवणुकीतून बाहेर पडला. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here