Monday, October 7, 2024
Homeकलारंजनमराठी अभिनेत्री तेलुगू सिनेमा गाजवतेय 

मराठी अभिनेत्री तेलुगू सिनेमा गाजवतेय 

छ्त्रपती संभाजीनगरची आहे ही अभिनेत्री

मुंबई –  मूळची छ्त्रपती संभाजीनगरची मराठी अभिनेत्री सध्या तेलुगू सिनेमात धुमाकूळ घालते आहे.  तेलुगू सिनेमातील विजय देवरकोंडा ,  रवी तेजा  इत्यादी सुपरस्टारबरोबर  ती झळकते आहे.

हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी , असिन, तब्बू, विद्या बालन, तमन्ना भाटीया , ऐश्वर्या राय, दिपिका पदुकोन, श्रुती हसन,   रश्मिका मंदाना , पूजा हेगडे, साई पल्लवी यासह  अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. मात्र एक मराठी अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून आता द्क्षिण विजय साजरा करीत आहे. 

छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )येथे जन्मलेली  ही 25 वर्षीय अभिनेत्री बिजिनेस मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहे. तिचे नाव भाग्यश्री बोरसे आहे. तिच्या वडीलांचे नाव दिलीप बोरसे , तर आईचे नाव राजश्री बोरसे आहे. भाग्यश्रीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. भाग्यश्री बोरसेने या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘यारियां २’ चित्रपटात भूमिका साकारली होती. चंदू चॅम्पियन या चित्रपटातील तिची भूमिकाही गाजली होती.

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती अभिनेता रवी तेजा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मिस्टर बच्चन’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

सध्या हिंदीत जे सिनेमा गाजतात ते तेलुगू सिनेमाचे रिमेक असतात. बाहुबली, आरआरआर यासारखी अनेक उदाहरणे देता येतील . मात्र भाग्यश्रीचा तेलुगू चित्रपट ‘रेड’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक आहे. 

 तेलुगू सुपरस्टार रवी तेजा हे अमिताभ बच्चनला आदर्श मानतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नव्या तेलुगू चित्रपटाचे नाव   मिस्टर बच्चन ठेवले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगणने हिंदीत काढलेल्या ’ रेड’ या चित्रपटाची कथा घेऊन रवी तेजा यांनी तेलुगू मध्ये हा चित्रपट ‘मिस्टर अमिताभ’ या नावाने काढला आहे.   या चित्रपटातील रवी तेजाची छबी अमिताभ बच्चन यांनी अँग्री यंग मॅन म्हणून ज्या भूमिका गाजविल्या त्त्यानुसार दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठी अभिनेत्री भाग्यश्री बोरसे यातील नायिकेची भूमिका करीत आहे. यातील भाग्यश्रीची भूमिका इतर दाक्षिनात्य अभिनेत्रींना मागे टाकेल अशी आहे. 

( Photos : Instagram )

रवी तेजाच्या या चित्रपटाचे पहिले गाणे ‘सतार’ रिलीज झाले आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे, ते रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. यातील भाग्यश्रीचा अंदाज लाजबाब आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शक हरीश शंकर आणि निर्माते  टीजी विश्व प्रसाद आहेत. 21 जुलै 2024 रोजी  हैदराबाद येथे ‘मिस्टर बच्चन’ चित्रपटाबाबत  आयोजित सोहळ्याला भाग्यश्री देखील उपस्थित होती.

भाग्यश्री बोरसे ‘व्ही -12’ या चित्रपटात  तेलुगू सुपस्टार विजय देवरकोंडा ची नायिका आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments