Monday, October 7, 2024
Homeबातम्यामुलींच्या सुरक्षेबाबत धक्कादायक प्रकार

मुलींच्या सुरक्षेबाबत धक्कादायक प्रकार

शाळेतही मुली सुरक्षित नाहीत, पालकांच्या चिंतेत भर

बंगळुरु – भारतात महिला सुरक्षित नाहीत यासंदर्भात देशभरात चर्चा सुरु असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे . आर्टिफिशियल इंटिलिजन्स ( एआय) चा वापर करून येथील शाळकरी मुलांनी वर्गातील मुलीचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते इतरांना पाठविण्याचा प्रकार घडला आहे .

कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीचा बलात्कार करून खून झाला . या घटनेमुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे .या देशात मुली, महिला सुरक्षित नाहीत असे च सारे म्हणत आहेत . त्यातच बंगळुरुचा या घटनेने खळबळ उडाली आहे .

बंगळुरु येथील एका सीबीएसई शाळेत हा प्रकार घडला आहे . एका मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे . नववीचा वर्गात शिकणाऱ्या शाळेतील एका मुलीला तिच्या वर्गमित्राने सांगितले की इन्स्ट्राग्रामच्या विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपवर  एआय द्वारे तयार केलेले तिचे आक्षेपार्ह फोटो फिरत आहेत .ती विद्यार्थिनी त्या इन्स्टाग्राम ग्रुपची सदस्य नसल्याने तिला हा प्रकार माहीत नव्हता . मित्राकडून माहिती मिळाल्यावर तिने आईला याची माहिती दिली . आईने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .

त्या मुलीच्या खाजगी इन्स्टाग्राम खात्यावरील फोटो वापरून एआय द्वारे आक्षेपाई फोटो तिच्या वर्गातीलच कोणीतरी हा प्रकार केला  असा पोलिसांना संशय आहे .

परदेशात अशा घटना घडल्या आहेत .मात्र भारतात हा प्रकार प्रथमच घडला आहे आणि तोही शाळकरी मुलीबद्दल . कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना मुला – मुलीच्या हाती मोबाईल द्यावे लागले तेव्हापासून शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागले आहे ऑनलाईन गेम, पोर्न या मोबाईलवर सहज उपलब्ध आहे . 

मोबाईलवर  एआय चा वापर अलिकडच्या काळातच सुरु झाला आहे चांगली शब्दरचना करणे, विविध प्रकारची छायाचित्रे तयार करणे असे प्रकार याद्वारे केले जात होते . मात्र एआय द्वारे मुलींचे सोशल मिडियावरील फोटो  वापरून त्यांची पोर्न स्वरूपातील आक्षेपार्ह फोटो तयार करता येतात हे लक्षात आल्यानंतर असे प्रकार सुरू झाले आहेत .

या घटनेमुळे मुलींना, पालकांना आणि शिक्षकांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments