Tuesday, February 18, 2025
Homeबातम्यासोलापूर विद्यापीठाच्या सायबर क्लबला उत्कृष्टता पुरस्कार

सोलापूर विद्यापीठाच्या सायबर क्लबला उत्कृष्टता पुरस्कार

सोलापूर, – पुणे येथे पार पडलेल्या क्विक हिल फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ समारंभात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सायबर क्लबला ‘बेस्ट क्लब ओव्हरऑल’ हा प्रतिष्ठीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच एमसीएची विद्यार्थीनी सुप्रिया शिंदे यांना “बेस्ट मिडिया डायरेक्टर” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजीवकुमार मेंते व विद्यापीठाच्या सायबर क्लबचे प्रमुख अधिकारी मालती जाधव, सायली शेळके, सुप्रिया शिंदे, शकुंतला बेळ्ळे उपस्थित होते क्विक हिल फॉउंडेशनचे अध्यक्ष अनुपमा काटकर, तसेच क्चिक हिल टेक्नॉलॉजिज् लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सालवी उपस्थित होते.सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रम अंतर्गत संगणकशास्त्र संकुलाच्या २२ विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील ९५ शाळा व महाविद्यालयातील अंदाजे ३४ हजार ५०० विद्यार्थ्यांना १४४ सादरीकरणाद्वारे सायबर सुरक्षेबद्दल जागरुक केले. या २२ विद्यार्थ्यांना क्विक हिल फाउंडेशनकडून विद्यावेतनही देण्यात आले. विद्यार्थ्यांनी याविषयी पथनाट्य सादर करुन त्याद्वारे नान्नज ग्रामपंचायत व माऊल कॉलेज, वडाळा येथे सुद्धा सायबर सुरक्षिततेबाबत साक्षरता निर्माण केली. या सर्व विद्यार्थ्यांनी सायबर साक्षरतेचे काम संकुलाचे संचालक डॉ. राजीवकुमार मेंते यांच्या मार्गदर्शनाखाली केले.क्विक हिल फाउंडेशनद्वारे कांचन निकंबे, सई अवताडे, रत्नप्रभा चंदनशिवे, ऋतुजा वाघमोडे, प्रवीण कोळी, सिध्दारामय्या स्वामी, मोहीनी दुधाळ, राहुल शिंदे, स्वप्नाली जाधव, वैष्णवी पाटील, रिध्दी खोकले, प्राजक्ता सरवदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वर्षीचा शैक्षणिक वर्षातील “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम राबविण्याकरिता कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा व कुलसचिव योगिनी घारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्विक हिल फाउंडेशनच्या अजय शिर्के, सुगंधा दानी, गायत्री केसकर, संकुलातील विभाग प्रमुख डॉ. अशोक शिंदे, डॉ. श्रीराम राऊत यांचे सहकार्य मिळाले.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments