Monday, July 27, 2026
Homeशिक्षणबातम्याउजनी धरण आज शंभर टक्के भरणार : धरणातून विसर्ग

उजनी धरण आज शंभर टक्के भरणार : धरणातून विसर्ग

टेंभुर्णी – सोलापूर जिल्ह्या साठी वरदान असलेले उजनी धरण ९४ टक्के भरले असून आज म्हणजे २७ जुलै २०२६ च्या रात्रीपर्यंत शंभर टक्के भरेल . त्यामुळे धरणातून एकंदर ६ हजार ६०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू झाला आहे .

जुलै महिना संपला तरीही सोलापूर जिल्हयात खूपच कमी पाऊस पडला आहे त्यामुळे केवळ २० टक्के पेरण्या झाल्या आहेत . एका बाजूला अशी परिस्थिती असताना जुलै महिन्यातच उजनी धरण शंभर टक्के भरून नदी व कालव्याहारे पाणी सोडले जाणार असल्याने शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुलैच्या सुरुवातीस उजनी धरणात वजा २७ असा पाणीसाठा होता . मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात भीमा नदी खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण निम्मे भरले . जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची टक्केवारी शंभरीच्या दिशेने वाढत गेली . २७ जुलै २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता धरणात जवळपास ९४ टक्के पाणीसाठी झाला . अजूनही धरणात ७० हजार क्युसेक्स पाणी येत आहे त्यामुळे धरण आज रात्रीपर्यंत शंभर टक्के भरेल

उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे भीमानगर कार्यकारी अभियंता डुंबरे यांनी यासंदर्भाने कळविले आहे की धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक जास्त असलेमुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. २७ जुलै २० २६ रोजी ठीक काळी अकरा वाजता सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे पाच हजार क्युसेक्स व विद्युतगृहा मधून १ हजार ६०० क्युसेक्स असा एकूण 6600 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरुवातीला नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. तसेच सखल भागातील नागरिकांना सूचना देण्यात याव्यात . व

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments