लंडनच्या विमानतळावरुन मायदेश ऑस्ट्रेलियाला रवाना
लंडन – विकिलिक्सचे संस्थापक आणि जागतिक कीर्तीचे शोधपत्रकार जुलिअन असांज यांची इंग्लंडमधील 1901 दिवसांच्या तुरुंगवासातून सुटका झाली. असांज यांना लंडनमधील उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर , दुपारी लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर त्याची सुटका करण्यात आली,तेथून 25 जुलै 2024 रोजी विमानात बसून ते ऑस्ट्रेलिया या मायदेशी रवाना झाले.
ज्युलियन असांज आता मुक्त आहेत. हा एका जागतिक मोहिमेचा परिणाम आहे ज्यामध्ये तळागाळातील लोक , माध्यम स्वातंत्र्य प्रचारक, लोक प्रतिनिधी , संयुक्त राष्ट्रसंघातील लोक यांच्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले. आता अमेरिकेच्या न्याय विभागाशी दीर्घकाळ वाटाघाटी करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
2×3 मीटरच्या तुरुंगातील् बराकीत पाच वर्षांहून अधिक काळ घालवावे लागलेले असांज उद्या त्याची पत्नी स्टेला असांज आणि त्यांच्या मुलांना भेटतील. या मुलांनी त्यांना यापूर्वी तुरुंगातून पाहिले आहे.
गेली पाच वर्षे असांज लंडनच्या दुर्गम भागातील कडेकोट बंदोबस्त असलेल्या बेलमार्श तुरुंगात होते. त्याआधी सात वर्षे, असांज यांनी मध्य लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता . तिथून त्यांना कुठेही बाहेर पडल्यास अटकेचीी शक्यता होती. इक्वेडोर मधील सत्ताबदलानतर असांज यांना दिलेला आश्रय काढून घेण्यात आला. त्यामुळे लंडन पोलिसांनी असांज यांना 2019 मध्ये इक्वाडोरच्या दूतावासातून बाहेर काढून बेलमार्श तुरुंगात बंदिवासात ठेवले होते.
विकिलिक्सनेअनेक गुप्त कागदपत्रे आणि गुप्त राजनैतिक संदेश उघड केल्याबद्दल अमेरिकेला असांज यांचे प्रत्यार्पण हवे आहे. असांज जगभरातील समर्थकांनी असांज यांच्या सुटकेसाठी निदर्शने आणि आंदोलने केली. उच्च न्यायालयाच्या या निर्नयाबद्द्ल असांज यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. आता असांज पुन्हा जोमाने विकीलिक्सचे कार्य करु शकतील .