नवी दिल्ली – फुले , आंबेडकर आदी समाजसुधारकांच्या साहित्यकृती म्हणजे विष आहे असे सोशल मीडियावरील एका निनावी पोस्टमध्ये म्हटले जाताच पंतप्रधान कार्यालयाने याची तात्काळ दखल घेऊन केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत देशातील सर्व विद्यापीठांना संबंधित अभ्यासक्रम आणि त्यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी मागविली आहे.
सोशल मीडियावरील या एका निनावी पोस्टद्वारे दिलेल्या यादीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जोतिराव फुले, पेरियार ई.व्ही. रामसामी, आर.एस. शर्मा, सावित्रीबाई फुले, उमा चक्रवर्ती, सुविरा जयस्वाल, अलोका पराशर, शिरीन रत्नागर, कांच इल्लाया शेफर्ड, जी. अलोयसियस आणि अनुपमा राव इत्यादींच्या 36 साहित्यकृतींचा विष म्हणून उल्लेख केलेला आहे.
वास्तविक निनावी पत्र, पोष्टची दखल सरकारी पातळीवर घेतली जात नसते, मात्र पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रलयाने एका निनावी पोष्टबाबत इतक्या ताडीने दखल घेऊन त्याबाबत तातडीने असे आदेश देण्यावरुन देशभर वादंग निर्माण झाला आहे.
ज्या समाजसुधारकांनी देशात समतेचा, जातीनिर्मूलनाचा विचार मांडला त्याच महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी समाजसुधारकांच्या विचारांना विष ठरविणा-या निनावी पोष्टवरुन अशी कार्यवाही करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक कांच इलाय्या शेफर्ड यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या बाबींमध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या सहभागावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामाजिक न्यायाच्या विरोधात आहेत आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा शिक्षणाचा तिरस्कार करते. पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांची सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर गप्प राहणारे पंतप्रधान, इंटरनेटवरील ‘ट्रोल्स’च्या (ट्रोलर्सच्या) एका इशाऱ्यावर मात्र तातडीने कृतीशील होतात.
वाद कशामुळे
२६ सप्टेंबर रोजी ‘एक्स’ (X) वर प्रकाशित झालेल्या पोस्टनंतर पंतप्रधान कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनेचा संदर्भ देत, उच्च शिक्षण विभागाने २७ सप्टेंबर रोजी केंद्रीय विद्यापीठांना तातडीने पत्र पाठवले. विद्यापीठांना त्यांची मते मांडण्यास आणि पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी नोंदणीची माहिती देण्यास सांगण्यात आले.
या पोस्टमध्ये काही वाचन-साहित्याच्या यादीला विद्यार्थ्यांसाठी हानिकारक असल्याचे म्हटले होते; या यादीत जात, पितृसत्ता आणि समाजसुधारणा या विषयांवरील साहित्याचा समावेश होता. या यादीत एकूण ३५ साहित्यकृतींचा समावेश होता, ज्यामध्ये आंबेडकर, फुले, गेल ओमवेट, शर्मिला रेगे आणि ब्रज रंजन मणी यांच्यासह इतर लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
या निनावी पोस्टचा समारोप अशा शब्दांत केला आहे की, ” कन्हैया कुमार किंवा नेहा बोरा यांना कोणी घडवले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे हे उत्तर आहे – आपली शिक्षण व्यवस्था. ही व्यवस्था अशा पुस्तकांनी आणि डाव्या विचारसरणीच्या शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हिंदू-विरोधी प्रचाराने ग्रासलेली आहे; आणि हे शिक्षकही याच शिक्षण व्यवस्थेची निर्मिती आहेत. आपल्याला हे दुष्टचक्र तोडण्याची गरज आहे.”
26 सप्टेंबर 2026 रोजी सोशल मिडियावर अशी निनावी पोष्ट येते आणिणि त्याच्या दुस-याच दिवशी 27 सप्टेंबररोजी पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावरुन केंद्रीय शिक्षण विभाग असे परिपत्रक काढते हे सारेच भयंकर असल्याची टीका अनेकांनी केली आहे.

