Thursday, November 12, 2026
Homeशिक्षणबातम्यारसगुल्ला म्हणून बॉम्ब खायला दिला : एका इसमाचा मृत्यू

रसगुल्ला म्हणून बॉम्ब खायला दिला : एका इसमाचा मृत्यू

भोपाळ – एका व्यक्तीने रसगुल्ला म्हणून गावठी बॉम्ब दिला , तो तोंडात चावल्याच्या प्रयत्नात राजेंद्र बरोतीया या ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे .

मध्य प्रदेशातून डिंडोरी जिल्ह्यातील पडरिया छाटा या गावात ही ए धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीला ‘रसगुल्ला’ म्हणून दिलेला देशी बनावटीचा बॉम्ब चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

ही घटना 10 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजता घडली असून, यात 35 वर्षीय राजेंद्र बरौतिया यांचा मृत्यू झाला . राजेंद्र बरौतिया रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर घराच्या अंगणात शेकोटीजवळ बसले होते. त्यावेळी त्याच गावातील रामभगत बरौतिया नावाचा व्यक्ती राजेंद्र यांच्याजवळ आला. दोघांमध्ये गप्पा सुरू असताना रामभगत याने राजेंद्र यांना एक वस्तू खाण्यासाठी दिली. ती वस्तू रसगुल्ला असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.प्रत्यक्षात ती वस्तू डुकरांची शिकार करण्यासाठी वापरला जाणारा देशी बनावटीचा स्फोटक बॉम्ब होता.

राजेंद्र यांनी रसगुल्ला समजून ती वस्तू तोंडात टाकली आणि दाताने चावताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांचा जबडा आणि तोंड गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने ऑटोरिक्षातून डिंडोरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. डिंडोरी कोतवाली पोलिसांनी रामभगत बरौतिया याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105 आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments