Monday, November 9, 2026
Homeशिक्षणबातम्यादिवाळी फटाक्यांच्या धुरामुळे दिल्ली मध्ये प्रदूषणाची पातळी गंभीर

दिवाळी फटाक्यांच्या धुरामुळे दिल्ली मध्ये प्रदूषणाची पातळी गंभीर

नवी दिल्ली – दिवाळीतील फटाक्यांच्या धुराने दिल्ली शहर झाकोळले असून हवेतील प्रदूषणाने अतिगंभीर पातळी ओलांडली आहे .

दिवाळीच्या रात्री दिल्लीवर धुराचे एक दाट आवरण पसरले होते. राजधानीत उत्सवाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यांवरील दिवे अंधूक झाले आणि संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला. रात्री १० वाजता एकूण ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (Air Quality Index – AQI) ३७१ वर पोहोचला होता, तर २० मॉनिटरिंग केंद्रांवरील हवा गुणवत्ता ‘गंभीर’ (severe) श्रेणीत नोंदवली गेली.
संध्याकाळ जसजशी पुढे सरकली, तसतसा धूर अधिकच दाट होत गेला. फटाक्यांमुळे निर्माण झालेला धूर रस्ते आणि निवासी भागांत साचून राहिला होता. हवेत जळलेल्या फटाक्यांचा उग्र वास दरवळत होता, अनेक भागांत दृश्यमानता (visibility) कमी झाली होती आणि नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या.
फटाके फोडण्यावर निर्बंध असूनही, रविवारी संध्याकाळी (८ नोव्हेंबर, २०२६) दिल्लीच्या अनेक भागांत फटाके फोडण्यात आले. पितमपुरा, बुराडी, मयूर विहार आणि ल्युटियन्स दिल्लीच्या काही भागांतून फटाके फोडल्याच्या बातम्या समोर आल्या.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारने नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ ‘हरित फटाके’ (green firecrackers) खरेदी करण्याचे आणि वापरण्याचे आवाहन केले होते.
संध्याकाळी ७ वाजता, एकूण ५९ मॉनिटरिंग केंद्रांपैकी १९ केंद्रांवर हवा गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत, ७ केंद्रांवर ‘वाईट’ (poor) श्रेणीत, तर उर्वरित ३३ केंद्रांवर ‘अत्यंत वाईट’ (very poor) श्रेणीत होती. जहांगीरपुरी येथे सर्वाधिक ४६० AQI नोंदवला गेला.

दिवसभरात शहराचा सरासरी AQI ३७६ (अत्यंत वाईट श्रेणी) इतका राहिला, जो शनिवारी ३६९ होता. शहरात सर्वत्र धूर आणि धुक्याचे (smog) आवरण पसरल्याने दृश्यमानताही कमी झाली होती.

न्यायालयाने रुग्णालये, नर्सिंग होम, आरोग्य केंद्रे, वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था आणि इतर अधिसूचित ‘शांतता क्षेत्रां’च्या (silence zones) ३०० मीटर परिसरात फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments