Thursday, October 3, 2024
Homeबातम्याशोध पत्रकार ज्युलिअन असांज यांना अपीलाची संधी : प्रत्यार्पण तूर्त टळले

शोध पत्रकार ज्युलिअन असांज यांना अपीलाची संधी : प्रत्यार्पण तूर्त टळले

लंडन –  विकिलिक्स या ऑनलाईन वृत्तपत्रातून अमेरिकेचा खरा चेहरा उघड करणारे आणि या बलाढय महाशक्तीला हादरविणारे शोधपत्रकार ज्युलिअन असांज यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्प्नण करण्यासंबंधी आज निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यार्पणाच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार असांज यांना आहे असा निर्णय येतील उच्च न्यायालयाने आज ( 20 मे 2024 रोजी) दिला त्यामुळे असांज साध्यातरी इंग्लडमध्येच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

उच्च न्यायालयाच्या या निर्नयाबद्द्ल असांज यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. आता असांज यांना अपील करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळू शकतो.

असांज यांचे छायाचित्र

गेली पाच वर्षे असांज लंडनच्या दुर्गम भागातील कडेकोट बंदोबस्त असलेल्या  बेलमार्श तुरुंगात आहेत.  त्याआधी सात वर्षे, असांज यांनी  मध्य लंडनमधील इक्वाडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता . तिथून त्यांना कुठेही बाहेर पडल्यास अटकेचीी शक्यता होती. इक्वेडोर मधील सत्ताबदलानतर असांज यांना दिलेला आश्रय काढून घेण्यात आला. त्यामुळे  लंडन पोलिसांनी असांज यांना 2019 मध्ये इक्वाडोरच्या दूतावासातून बाहेर काढून बेलमार्श तुरुंगात बंदिवासात ठेवले आहे. 

विकिलिक्सनेअनेक गुप्त कागदपत्रे आणि गुप्त राजनैतिक संदेश उघड केल्याबद्दल अमेरिकेला असांज यांचे प्रत्यार्पण हवे आहे.  अमेरिकेने प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू केली आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की असंज यांची कृती बेपर्वा, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी आहे.  असांज याांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की खटला चालवणे हे एक ढोंग आहे, पत्रकारिता आणि भाषण स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि पाश्चिमात्य सरकारांना लाजिरवाणेपणाचा बदला आहे.

पार्श्वभूमीपाच वर्षे तुरुंगवास , सात वर्षे एकांतवास 

अमेरिकेने खटला सोडला पाहिजे असे सांगून प्ली बार्गेन डील शक्य असल्याच्या यूएसच्या ढोंग आहे. अहवालांवर स्टेला काढली जाणार नाही. सोमवारी तो हरला तर तिचा लढा, गेल्या दशकापासून सुरूच राहील.

“मी जे काही करू शकतो ते करेन, आणि तो मुक्त होईपर्यंत आमचे कुटुंब त्याच्यासाठी लढणार आहे.”

कोण आहेत असांज

ज्युलिअन असांज हे मूळचे ऑस्ट्रेलिअन नागरिक . वयाच्या 35 व्या वर्षी म्हणजे इ.स. 2006 मध्ये त्याने काही सहकार्‍यांच्या मदतीने ‘विकिलिक्स’ या ऑनलाईन वृत्तपत्राची सुरुवात करुन, इंटरनेटवरील शोधपत्रकारितेच्या क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली.  अमेरिकेची अनेक गुप्त कागदपत्रे व संदेश उघड करुन ज्युलिअन असांज यांनी अमेरिकेची झोप उडवली. अमेरिकेची गुप्त खलबते कशी चालतात ते त्यांनी उघड केले. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेचा दुष्ट चेहरा त्यामुळे सर्वांना दिसला. विशेषतः अमेरिकेने अफगानिस्तान आणि इराकमध्ये केलेल्या लष्करी हस्तक्षेपाच्या वेळी केलेल्या अतिरेकाची सविस्तर माहिती विकिलिक्सने उघड केली. त्यामुळे अमेरिकेचा विश्व रक्षणाचा  मुखवटा गळून पडला. 

अमेरिका जगातील इतर अनेक देशांना कशी कस्पटासमान वागणूक देते व आपल्या स्वार्थासाठी प्रसंगी निरपराध नागरिकांचेही बळी घेण्यास कचरत नाही हे यातून जगाला दिसले. ज्युलिअन असांज यांनी इतर अनेक देशांचीही अनेक गुपिते उघडकीस आणली त्यामुळे अनेक देशांच्या प्रमुखांना असांज यांचा आवाज कायमचा बंद करण्याची इच्छा आहे. अमेरिकेने तर असांज यांचा आवाज दडण्यासाठी जंग-जंग पछाडले, ज्या कंपन्यांच्या तांत्रिक मदतीने विकिलिक्सची वेबसाईट उपलब्ध करुन दिली जाते त्या कंपन्यांवर दडपण आणून त्या वेबसाईट बंद पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले , पण प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाहून बातम्यांचे प्रसारण सुरु ठेऊन असांज यांनी विकिलिक्सला जिवंत ठेवले. या सार्‍या प्रक्रियेत जगभरातून अनेक लोक विकिलिक्सला सहकार्य करण्यासाठी पुढे आले. विकिलिक्स ही वेबसाईट साम्राज्यवादयांचे, भ्रष्टाचार्‍यांचे बुरखे फाडून सत्य जगासमोर मांडणारी संस्था आहे हे जाणवल्याने विकिलिक्स आणि असांज यांना बातम्या पुरविणारे व या कार्यात पाठिंबा देणारे लोक असंख्य आहेत. इंटरनेटच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करीत असांज व सहकार्‍यांनी वेगवेगळ्या देशातून विकिलिक्सचे प्रसारण सुरुच ठेवले.

अम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक संस्था व व्यक्तींनीही याप्रकरणी अमेरिकेला विनंती केली पण, अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.विकिलिक्सची बँकांमधील खाती ठप्प करण्यात आली आहेत .असांज यांच्या शोधपत्रकारितेचा गौरव अनेकांनी केला आहे. पण अमेरिका आणि त्यांच्या अंकित असणार्‍या देशातील सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात ते सलत होते. 

असांज यांना खटल्यात अडकविले

असांज यांना कसे आणि कुठे अडकविता येईल याचा हे सारे शोध घेत होते. अखेरीस 2010 मध्ये असांज स्वीडनमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असताना तेधे घडलेल्या एका घटनेमुळे असांज यांच्या विरोधात कारवाई करायला कारण मिळाले .ऑगस्ट 2010 मध्ये दोन स्वीडनमधील दोन महिलांनी असांज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली, त्यानुसार असांज यांनी यातील एका महिलेवर बलात्कार केल्याचा तर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप केला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर एका अधिकार्‍याने या तक्रारीत फारसे तथ्य नाही असा निर्वाळा  देऊन असांज यांच्यावर कारवाईची गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी दुसर्‍या अधिकार्‍याने ही केस पुन्हा तपासासाठी हाती घेतली व असांज यांच्यावरचे आरोपपत्र ठेवावे असा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात असांज इंग्लंडमध्ये आले होते.त्यामुळे स्वीडनने असांज यांच्याविरुध्द आंतरराष्ट्रीय वॉरंट काढले. असांज यांना चोकशीसाठी आमच्या ताब्यात दयावे अशी मागणी स्वीडनने  इंग्लंडकडे केली.  असांज इंग्लंडमधील पोलिसांपुढे हजर झाले व त्यांनी तेथील न्यायालयात अपील केले. आपण निर्दोष असून मला या प्रकरणात गोवण्यात येत आहे, मला स्वीडनला नेल्यावर अमेरिकेच्या हवाली करण्यात येईल व  ठार मारले जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपणास स्वीडनच्या हवाली करु नये , जी काही चौकशी करायची असेल ती स्वीडन पोलिसांनी इंग्लंडमध्ये येऊन करावी अशी विनंती असांज यांनी न्यायालयाकडे केली. मात्र प्रारंभी जिल्हा न्यायालयाने , नंतर उच्च तसेच सर्वोच्च न्यालयाने असांज यांची विनंती फेटाळत असांज यांना स्वीडन पोलिसांच्या हवाली करावे असा आदेश दिला. हा सारा घटनाक्रम लक्षात घेता असांज म्हणतात अमेरिकेच्या सांगण्यावरुन हे सारे घडले आहे. कारण इंग्लंड, स्वीडन हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकाधार्जिने देश म्ह्णून ओळखले जातात.

दूतावासात आश्रय

सारे उपाय खुंटल्यावर असांज यांनी नवी युक्ती लढविली आणि 19 जून 2012 रोजी लंडन शहरात असलेल्या इक्वेडोर देशाच्या दूतावासात आश्रय घेतला. 2019 पर्यंत असांज दूतावासाच्या एका खोलीत होते. या दूतावासात लेडी गागा, पामेला अँडरसन यांच्यासह अनेक सेलेब्रेटी असांज यांना भेटत असत.  दूतावासाबाबत आंतरराष्ट्रीय नियम असे आहेत की कोणत्याही देशाच्या पोलिसांना अथवा लष्कराला दुस-या देशाच्या दूतावासात प्रवेश करता येत नाही. रशियाला हव्या असणार्‍या एका व्यक्तीने अमेरिकेच्या दूतावासात तब्बल पंधरा वर्षे मुक्काम ठोकला होता व रशियाला काहीच करता आले नव्ह्ते .

इक्वेडोर हा लॅटिन अमेरिकन देश आहे. या देशाच्या अध्यक्षांनी असांज यांना राजकीय आश्रय देत असल्याचे जाहीर करुन तेव्हा खळबळ उडवून दिली होती.

तीन महत्वाच्या घटना 

वर्ष  2019 मध्ये तीन महत्वपूर्ण घटना घडल्या . नोव्हेंबर  2019 मध्ये स्वीडन सरकारने असांज यांच्याविरुध्दचा खटला रद्द केला . दुसरीकडे इक्वेडोर मध्ये सत्ताबदल झाला. नव्या सत्ताध-यांनी  असांज यांना दूतावासात दिलेला आश्रय काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  लंडन पोलिसांनी असांज यांना 2019 मध्ये इक्वाडोरच्या दूतावासातून बाहेर काढून बेलमार्श तुरुंगात बंदिवासात ठेवता आले. असांज यांना तुरुंगात मानसिक त्रास दिला जातो असा कुटंबियांचा आरोप आहे. जर असांज यांचे पूर्वीचे आताचे छायाचित्र पाहिले तर या आरोपास पुष्टी मिळते.

अमेरिकेकडे असांज यांचे प्रत्यार्पण करण्याच्या खटल्याचा निर्णय आता लांबला आहे. आ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments