Wednesday, December 11, 2024
Homeपर्यावरणराज्यस्तरीय पक्षी सप्ताहास प्रारंभ

राज्यस्तरीय पक्षी सप्ताहास प्रारंभ

सोलापूर – सोलापूर येथे 5 नोव्हेंबर 2024 रोजी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या हस्ते राज्यस्तरीय पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र पक्षीमित्र, जी आय बी फाउंडेशन, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन , विहंग मंडळ वनविभाग प्रादेशिक , माळढोक पक्षी अभयारण्य यांच्या वतीने अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या वाढदिवसा निमीत्त त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व माळढोक पक्षी अभयारण्य कॉफी टेबल बुक भेट देण्यात आले. अरण्यऋषी चितमपल्ली यांनी पक्षी सप्ताह 2024 चे औपचारिक उद्घाटन करत पक्षांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शनाचा बॅनर आणि छायाचित्रांचे लोकार्पण केले. याप्रसंगी महाराष्ट्र पक्षी मित्र 34 व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. श्री निनाद शहा सर जी आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर , सचीव श्री राजकुमार कोळी, विहंग मंडळाचे बाबा गायकवाड, शिखरे सर यांच्यासह माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वनरक्षक सुनिल थोरात, सारंग म्हमाणे, श्री बाबा साठे, मारुती गवळी उपस्थित होते.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि पद्मभूषण डॉ सलीम अली यांची जयंतीचे औचित्य साधून 5 ते 12 नोव्हेंबर मधे साजरा केला जाणारा पक्षीसप्ताहाचा प्रचार, प्रसार करुन सर्वसामान्य भारतीयांमधे पक्षांबाबत आवड निर्माण व्हावी, तसेच पर्यावरण आणि जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनाबाबत संवैधानिक कर्तव्य भावना रुजवण्यासाठी ग्रेट इंडियन बायोडायव्हर्सिटी फाउंडेशन च्या माध्यमातून शहरात विविध परीसरात पक्षांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात भारत भरातील विविध पक्षांची ,नामवंत वन्यजीव छाया चित्रकारांनी काढलेली 100 पेक्षा जास्त छायाचित्रे प्रदर्शित केली जात आहेत.

2013साली पुण्यात भरलेले बर्डफेस्ट नावाचे नेचरवॉक संस्थेने भरवलेले प्रदर्शन सोलापूरकरांसमोर प्रदर्शीत केले जाण्यासाठी निसर्ग संवर्धक पंकज चिंदरकर यांना भेट देण्यात आले असुन या छायाचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरीकांमधे सातत्याने जनजागरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

या पक्षी सप्ताहात छायाचित्र प्रदर्शनाचे पहिले पुष्प म्हणून अरण्यऋषींच्या जन्मदिवशी त्यांच्या निवासस्थाना बाहेर मल्लीकार्जुन नगर, हेरीटेज मणीधारी एम्पायर, यशवंत सूतमील कंपाउंड येथे भरवण्यात आले आहे

पक्षांच्या छायाचित्रांचे फिरते प्रदर्शन जी आय बी फाउंडेशन च्या विश्वस्त मंडळाच्या नियोजनात , कार्यवाहक सचिव श्री राजकुमार जगदिश कोळी परीश्रम घेत आहेत.

हे प्रदर्शन 12 नोव्हे बर पर्यंत अनुक्रमे दि.6 डीमार्ट समोर जुळे सोलापूर , दि.7 शासकीय मैदान, विजापूर रोड, दि.8 वसंत विहार जूना पूणे नाका, दि ९9बाळे , दि.10 गणपती घाट सिद्धेश्वर मंदिर परिसर, दि.12इंद्रभुवन परीसर सोमपा येथे रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत प्रदर्शीत केले जाणार आहे. सोलापूर.अधिक माहिती साठी 7083460066 आणि 8482810641 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments