Tuesday, October 8, 2024
Homeकलारंजनवो स्री है , कुछ भी कर सकती है 

वो स्री है , कुछ भी कर सकती है 

मुंबई – ‘ वो स्री है कुछ भी कर सकती है l’  हा संवाद चित्रपटातच शोभून दिसतो , तोही  चित्रपटात भूत म्हणून दाखविलेल्या पात्राच्या तोंडी. वास्तव मात्र फार वेगळे असते आणि आहे.

बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा देशाच्या विविध राज्यातून बलात्काराच्या भयावह बातम्या उघडकीस येत आहेत. साराा देश या बातम्या समजल्यावर सुन्न झाला आहे. आपल्या देशात लहान मुलीपासून वृध्द स्री पर्यंत कोणी सुरक्षित आहे का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

विरोधाभास म्हणजे याच काळात ‘स्री-2 ‘ हा चित्रपट भारतात 300 कोटी तर  जगभरात एका आठवड्यात 400 कोटी अशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. 

बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ची कमाई जोरात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांपैकी श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रचंड कमाई करत आहे, याच आठवड्यात प्रदर्शित झालेले ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ हे दोन चित्रपट मोठे कलाकार असूनही अयशस्वी झाले आहेत. गेल्या सात दिवसांत या तिन्ही चित्रपटांना 15 ऑगस्टची सुट्टी, वीकेंड आणि रक्षाबंधनाची अर्धवट सुट्टी या दिवशी कमाईची संधी होती. पण ‘स्त्री 2’ व्यतिरिक्त इतर दोन चित्रपटांना त्याचा काही फायदा होऊ शकला नाही. परिस्थिती अशी आहे की, ‘स्त्री 2’  आठ दिवसांत 300 कोटीपेक्षा अधिक  रुपयांची कमाई करून देशात सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला असताना ‘खेल खेल में’ आणि ‘वेद’ त्यातील 7%ही कमाई करू शकले नाहीत.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री – 2’ हा  चित्रपट स्त्री चित्रपटाचा सिक्वेल आहे.  हा चित्रपट कमाईच्या बाबतीत इतका कमाई करेल असे कोणाला अपेक्षित नव्हते. 

 या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 14 ऑगस्ट रोजी रिलीजपूर्वी 8.5 कोटी रुपयांची कमाई केली. आठ दिवसांत या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कमाईचा विचार केल्यास हा आकडा 400 कोटीवर जातो. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत कल्की, जवान, पठाण , ऑनिमल या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments