सोलापूर जिल्हयातील दिग्दर्शकाची कलाकृती
स पुणे – जगप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांचा सजना हा पहिला चित्रपट 27 जून 2025 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे . शशिकांत धोत्रे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली .
या चित्रपटाची कथा, पटकथा ,दिग्दर्शन आणि निर्मिती याची जबाबदारी शशिकांत धोत्रे यांनी पार पाडली आहे. .शशिकांत धोत्रे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून जागतिक स्तरावर प्रख्यात चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे .अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगभरातील अनेक मान्यवरांकडे शशिकांत धोत्रे यांची चित्रे आहेत .

मी मुळात चित्रकार आहे ,त्यामुळे चित्रपट केला म्हणजे फार काही वेगळे केले असे वाटले नाही .मात्र चित्रपट करत असताना वेगळे काही घडत गेले .काही गोष्टी मनाप्रमाणे घडल्या, काही घडल्या नाहीत .काही चुका झाल्या, त्या चुकातून शिकत गेलो. मात्र सिनेमा तयार करताना खूप मजा आली असे शशिकांत धोत्रे यांनी सांगितले . हा चित्रपट चांगला झाला असून सर्वांनी आवर्जून पहावा असे आवाहनही त्यांनी केले .

शशिकांत धोत्रे यांचा सजना या चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहेत शशिकांत धोत्रे आर्ट या संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे .या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अभय चव्हाण यांनी कार्य केले आहे . या चित्रपटात तृप्ती मोरे ,आकाश सर्वगोड आणि संभाजी पवार हे प्रमुख कलाकार आहेत. या तिघांनीही या चित्रपटाद्वारे चित्रपटाच्या क्षेत्रात आणि अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे .
चित्रपट संगीताची जबाबदारी ओंकार स्वरूप यांनी पार पाडली असून त्यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडील असे आहे .या चित्रपटातील गाणी नामवंत गायकांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेली आहेत. सोनू निगम ,आनंद शिंदे ,आदर्श शिंदे, मधुश्री भट्टाचार्य ,कडूबाई खरात, प्रियंका बर्वे ,ओंकार स्वरूप, वैशाली माडे आणि राजेश्वरी पवार यांनी या चित्रपटासाठी गायन केले आहे. गीतकार सुहास मुंडे हे आहेत .चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेला आहे यात नातेसंबंधाची तरल गुंफण आहे