Monday, November 4, 2024
Homeबातम्यासाठीतल्यांना पंचविशीतले तरुण बनविणारे यंत्र

साठीतल्यांना पंचविशीतले तरुण बनविणारे यंत्र

बंटी बबलीचा कानपूरमध्ये धुमाकूळ

कानपूर – साठीतला माणूस टाईम मशीनमध्ये बसून पंचविसाचा होऊ शकतो हे सिनेमात पाहिले. मात्र आता खरोखर असे एक यंत्र इस्त्रायलने तयार केले आहे ते आमच्याकडे आहे असे सांगणा-या बंटी बबलीने कानपूरमध्ये धुमाकूळ घातला आहे.  

साठीतल्या वृध्दांना पंचविशीत आणणारे  यंत्र आम्ही इस्त्रायलमधून मागवले आहे,या उपचारासाठी एका व्यक्तीस 90 हजार रुपये लागतात असे सांगत वीसहून  अधिक व्यक्तींना फसवून राजीव आणि रश्मी दुबे या दाम्पत्याने बंटी बबली पध्दतीने लोकांना 35 लाखांना लुबाडले आहे. 

हे जोडपे किदवई नगरमध्ये ‘रिव्हायव्हल वर्ल्ड ‘ नावाचे उपचार केंद्र चालवत होते. आम्ही एक इस्रायली यंत्र आणले आहे. हे यंत्र वृद्धांनाही तरुण बनवते.कानपूरच्या प्रदूषणामुळे लोक वृध्द होतात. या यंत्रातील ऑक्सिजन थेरेपीमुळे उलटफेर करता येतो. साठ वर्षाची व्यक्ती पंचवीस वर्षाची तरुण व्यक्ती बनते असे त्यांनी अनेक वृध्द पुरुष आणि महिलांना सांगितले. तरुण्‍ ाहोण्यासाठी प्रत्येकी 90 हजार रुपये लागतात असे सांगून वीस पेक्षा अधिक व्यक्तींकडून पैसै गोळा केले. त्यांच्या गळाला अनेक उच्चशिक्षित व्यक्तीही लागले. काहींच्या लक्षात आले की आपण फसव्ले जात आहोत, मात्र आप्णच तरुाण होण्याच्या लालसेने पैसेभरले हे लोकांना समजले तर आपले हसे आणि बदनामी होईल या भीतीपोटी कोणी तक्राारीस पुढे येत नव्हते. 

नंतर डॉ. रेणू सिंग चंदेल यांनी धैर्य दाखवले आणि पुढे त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. एक तक्रार झाल्यावर बाकीचे लोकही तक्रार देण्यास पुढे आले. स्थानिक अधिकाऱ्यांनी या जोडप्याला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी विमानतळांना सतर्क केले, मात्र दरम्यान राजीव आणि रश्मी दुबे परदेशात पळून गेले असावेत अशी शांका व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments