अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आंदोलनाला पाठिंबा
हैदराबाद – तेलंगणा सरकारने हैदराबाद विद्यापीठाच्या 400 एकर जमिनीच्या लिलावाचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली त्यांची त्वरित सुटका करावी आणि लिलाव रद्द करावा या मागाणीस जेएनयू सह इतर विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत आहे
कांचे गाचीबावली येथील युनिवर्सिटी ऑफ हैदराबादच्या (यू .ओ .एच . ) एकंदर 400 एकर जमिनीचा लिलाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी एकता दर्शवली आहे.
इंग्रजी आणि परदेशी भाषा विद्यापीठ ( इ . एफ . एल . यू .) .आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जे .एन .यू. ) विद्यार्थ्यांनी जैवविविधतेने समृद्ध असलेली जमीन विकण्याच्या निर्णयाचा निषेध केला.
यू. ओ. एच. विद्यार्थी संघटनेच्या मागण्यांसोबत उभे राहून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे (जेएनयूएसयू) अध्यक्ष धनंजय यांनी लिलावासाठी जमीन मंजूर करण्याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची त्वरित आणि बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली.
एका निवेदनात, धनंजय यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या घटनांची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली.जेएनयूएसयूला भ
ईएफएलयू विद्यार्थी युनियनचे अध्यक्ष विकास पोरिका म्हणाले की, जमिनीचा लिलाव खासगी नफ्यासाठी केला जात असून आधीच कमी होत असलेल्या नैसर्गिक परिसंस्था आणि जैवविविधतेला आणखी धोक्यात आणण्याचे काम करतो.
“ई. एफ. एल. यू. विद्यार्थी संघटना यू. ओ. एच. च्या आंदोलक विद्यार्थ्यांसोबत एकजुटीने उभी आहे”, असे ते म्हणाले.