मुंबई, २६ सप्टेंबर २०२६ : राज्यातील खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची तूट, दीर्घकाळचा कोरडा कालावधी आणि पीकस्थितीचा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर जाहीर केला आहे.
या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबरच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांना गती, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि जलसंधारणाची कामे अशा उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.
दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत पर्जन्यमानातील तूट, सलग कोरडा कालावधी, पेरणी क्षेत्रातील घट, वनस्पती व जल निर्देशांक, जमिनीतील आर्द्रता आणि प्रत्यक्ष पीकहानी अशा विविध घटकांचा विचार केला जातो.
जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुके
कोकण विभाग
- रायगड – : श्रीवर्धन
- रत्नागिरी – : रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
- सिंधुदुर्ग – : सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
- नाशिक विभाग
- नाशिक – : मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
- धुळे – : धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर
- जळगाव – : एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
- नंदुरबार – : अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
- अहिल्यानगर – :नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता
पुणे विभाग
- पुणे – :भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
- सोलापूर – :उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
- सांगली – : मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ
- सातारा – :सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
- कोल्हापूर – : पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
मराठवाडा
- छत्रपती संभाजीनगर – : छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
- जालना – :बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद
- बीड – :बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
- लातूर – :लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
- धाराशिव – : धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा
- नांदेड – :नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
- परभणी – : पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
- हिंगोली – : हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
विदर्भ
- बुलढाणा – : जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
- अमरावती – : अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर
- अकोला – : अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
- वाशिम – :वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा
- यवतमाळ – : यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
- वर्धा – :वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
- नागपूर – : नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
- भंडारा – :भंडारा, पवनी, लाखांदूर
- गोंदिया – : तिरोडा
- चंद्रपूर – : चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा
- गडचिरोली – :गडचिरोली, चामोर्शी
- या निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत झाला आहे. ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांतील एकाही तालुक्याचा समावेश या यादीत नाही. सर्वाधिक तालुके प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ (१६), जळगाव (१५), अहिल्यानगर (१४), अमरावती (१४), नांदेड (१४) आणि नागपूर (१४) यांचा समावेश आहे.

