मुंबई – एसटी प्रवासात तिकिट सवलत मिळण्यासाठी स्मार्ट कार्डची केलेली सक्ती एसटी महामंडळाच्या अंगलट आली आहे . महिला प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरविल्याने कार्ड सक्ती दोन माहिने लांबणीवर टाकण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे .
सप्टेंबर २०२६ मध्ये एसटीला 33 कोटी उत्पन्न मिळाले होते . ऑक्टोबर मध्ये ते वाढण्याऐवजी २८ कोटी झाले म्हणजे पाच लाख कमी उत्पन्न मिळाले .
आतापर्यंत सुमारे १.१ कोटी कार्डे जारी करून वितरित करण्यात आली आहेत असे महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले . ते पुढे म्हणाले ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ ( एनसीएमसी) स्मार्ट कार्ड मिळवण्याची अंतिम मुदत १ जानेवारी २०२७ पर्यंत वाढवली आहे. बस भाड्यात सवलत मिळवण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) प्रमुख असलेले सरनाईक यांनी सांगितले की, महिला प्रवासी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्डशिवायही एसटी बसेसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करू शकतील.
या वर्षाच्या सुरुवातीला, एसटी महामंडळाने ने प्रवास सवलती अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप सुरू केले होते आणि १ ऑक्टोबरपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कार्डे अनिवार्य केली होती.
मंत्र्यांनी सांगितले की, विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि मंत्र्यांकडून आलेल्या विनंत्या व सूचनांचा विचार करून ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

