मुंबई / पुणे – कार्यक्रमासाठी कोणाचे प्रायोजकत्व स्वीकारले, पाहुणे म्हणून कोणाला बोलावले ,पुरस्कार कोणाला घोषित केले यासारख्या कारणावरून महाराष्ट्रातील साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात नवे वाद निर्माण झाले आहेत .
लोकसत्ता वृत्तपत्राने मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या लिटफेस्टवर काही निमंत्रित साहित्यिकांनी बहिष्कार घातला आहे . राज्यात आणि देशात ज्या अदानी उद्योगसमूहाने पाणी, जमीन, जंगल ताब्यात घेऊन एकाधिकारशाही निर्माण केली आणि पर्यावरणाचे नुकसान केले त्यांचे प्रायोजकत्व लोकसत्ताने लिटफेस्ट साठी स्वीकारले यामुळे ही नाराजी व्यक्त झाली . अदानींचे प्रायोजकाव स्वीकारणाऱ्या लोकसत्ता लिटफेस्ट ला जाणार नाही अशी भूमिका ऐश्वर्या रेवडकर , प्रवीण बांदेकर यांनी घेतली आहे .
महात्मा फुले द्विशताब्दी निमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे पुणे येथे २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित केलेल्या फुले महोत्सवात उज्ज्वला गौड या सनातनी विचाराच्या महिलेला पुरस्कार दिला जात आहे . न्या. प्रकाश परांजपे, माजी विश्वस्त, प्रकाश कांबळे माजी राष्ट्रीय अध्यक्ष,झेलम परांजपे माजी विश्वस्त,सुरेश खैरनार माजी राष्ट्रिय अध्यक्ष,राजाभाऊ, युवराज मोहिते,, जतीन देसाई यांच्यासह अनेकांनी याचा निषेध केला आहे . अभिनेता किरण माने यांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे .
राष्ट्र सेवा दल या संघटनेला स्वातंत्र्य लढा ते सामाजिक परिवर्तन असा मोठा इतिहास आहे. साने गुरुजींनी संघर्ष आणि विचारांनी बांधणी केलेलं हे संघटन आहे. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या पायावर ही संघटना ८० वर्ष उभी आहे.सनातनी विचारांच्या विरोधात ज्या महात्मा फुले यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र त्यांच्याच द्विजन्मशताब्दीत सनातनी विचारांचा पुरस्कार माजी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते केला जाणार आहे. याचा या सर्वांनी निषेध केला आहे .
या निषेधानंतर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी खुलासा केला असून अनवधानाने नको त्या व्यक्तीला पत्र दिले असे म्हटले आहे .

