Wednesday, August 26, 2026
Homeशिक्षणबातम्याउजनी धरण शंभर टक्के भरले : धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

उजनी धरण शंभर टक्के भरले : धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

टेंभुर्णी – सोलापूर जिल्ह्या साठी वरदान असलेले उजनी धरण ९४ टक्के भरले असून आज म्हणजे २७ जुलै २०२६ च्या रात्री शंभर टक्के भरले . त्यामुळे धरणातून एकंदर ३०हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू झाला आहे .

जुलै महिना संपला तरीही सोलापूर जिल्हयात खूपच कमी पाऊस पडला आहे त्यामुळे केवळ २० टक्के पेरण्या झाल्या आहेत . एका बाजूला अशी परिस्थिती असताना जुलै महिन्यातच उजनी धरण शंभर टक्के भरून नदी व कालव्याहारे पाणी सोडले जाणार असल्याने शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुलैच्या सुरुवातीस उजनी धरणात वजा २७ असा पाणीसाठा होता . मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात भीमा नदी खोऱ्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण निम्मे भरले . जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातील पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची टक्केवारी शंभरीच्या दिशेने वाढत गेली .

२७ जुलै २०२६ रात्री धरणात जवळपास शंभर टक्के पाणीसाठी झाला . अजूनही धरणात ७० हजार क्युसेक्स पाणी येत आहे . आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून २७ जुलै रोजी रात्री ३० हजार क्यूसेक्स एवढा विसर्ग करण्यात आला आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे भीमानगर कार्यकारी अभियंता डुंबरे यांनी दिल्या आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments