न्यूयॉर्क – ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकेतील विविध विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी जोरदार निदर्शने केली .दुसऱ्या बाजूला हॉवर्ड विद्यापीठाला अमेरिकन प्रशासनाकडून दिली जाणारी मदत बंद करू असा इशारा ट्रम्प प्रशासनाने देताच देणगीदारांनी हॉवर्ड विद्यापीठावर देणग्यांचा वर्षाव करत ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध दर्शविला आहे .
हॉवर्ड ,केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी 18 एप्रिल 2025 रोजी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली . ज्यात निधीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची हकालपट्टी आणि गाझामधील युद्धाबद्दल मुक्त भाषण दडपून टाकणे यांचा समावेश आहे.हार्वर्डसह शाळांमध्ये निदर्शने करण्यात आली, जिथे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने असे म्हटले आहे की ते 2.2 अब्ज डॉलर्सचे अनुदान गोठवू आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विद्यापीठाची परवानगी रद्द करण्याची धमकी देत आहे. ज
ट्रम्प प्रशासनाच्या या धमकीचा उलट परिणाम झाला असून हॉवर्ड विद्यापीठाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे .देणगीदारांनी हॉवर्ड विद्यापीठाची भूमिका योग्य ठरवत या विद्यापीठावर देणग्यांचा वर्षाव सुरू केला आहे .विद्यापीठाला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये 40 पटींनी वाढ झाल्याचे दिसत आहे . अवघ्या 24 तासात विद्यापीठाला 1 .1 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या प्रमाणात देणगी मिळाल्या . आ देणगी मिळण्याचा हा ओघ सुरूच आहे .