Thursday, October 3, 2024
Homeबातम्या देशातील शीर्ष राज्य विदयापीठात महाराष्ट्रातील चारच विद्यापीठे 

 देशातील शीर्ष राज्य विदयापीठात महाराष्ट्रातील चारच विद्यापीठे 

एन. आय.आर.एफ. ने जाहीर केलेल्या क्रमवारीत महाराष्ट्र मागे

नवी दिल्ली –  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील राज्य विद्यापीठांची गुणवत्ता क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार  निवडलेल्या 50 विद्यापीठात महाराष्ट्र राज्याने स्थापन केलेल्या चार विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील संस्थांना अपेक्षित दर्जा राखता आलेला नाही. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ही संस्था, विविध निकषांवर आधारित भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करून त्यांची क्रमवारी जाहीर करते. एकूण 13 श्रेणींमध्ये NIRF क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यात विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, दंत, कायदा, वास्तुकला आणि नियोजन, कृषी आणि संबंधित क्षेत्रे आणि नवोपक्रम यांचा समावेश आहे. 

चार राज्य विद्यापीठे  यादीत 

मुंबई विद्यापीठ

या संस्थेने 2024 साठी जाहीर केलेल्या विविध प्रकारच्या क्रमवारीत देशातील अव्वल    50 राज्य विद्यापीठांचीही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे  तिस-या स्थानी आहे, मुंबई विद्यापीठ , मुंबई 18 व्या स्थानी आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे 33 व्या स्थानी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर 46 व्या स्थानी आहे. राज्य विद्यापीठांच्या या क्रमवारीत तामिळनाडूमधील अण्णा युनिवर्सिटी पहिल्या स्थानी आहे. 

डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

दहा शिक्षणसंस्था शीर्ष 100 मध्ये 

देशातील सर्व  शिक्षण संस्थांमध्ये पहिल्या 100 संस्थांची यादीही एन.आय.आर.एफ.ने  जाहीर केली आहे. या यादील अव्वल स्थानी आय.आय.टी. चेन्नई आहे. या 100 संस्थांमध्ये महाराष्ट्रतील दहा संस्थांचा समावेश झाला आहे. यात तिस-या स्थानी आय.आय.टी. मुंबई आहे. होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई  27 व्या स्थानी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 37 व्या स्थानी आहे. आय्‍.आय.एस.सी पुणे  42 व्या स्थानी आहे. सिंम्बॉयसिस इंटरनॅशनल. पुणे  52 व्या स्थानी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई 56 व्या, डॉ. डी. वाय. पाटील पुणे विद्यापीठ 63 व्या स्थानी, दत्ता मेघे इन्स्टिट्युूट , वर्धा 71 व्या स्थानी आहे. विशेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट  , नागपूर 77 व्या स्थानी आहे. एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , मुंबई 84 व्या स्थानी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई 98 व्या स्थानी आहे. 

सिंबॉयसिस देशात अव्वल कौशल्य विद्यापीठ

 याशिवाय देशातील कौशल्य विदयापीठाच्या क्रमवारीत सिम्बॉयसिस, विद्यापीठ, पुणे पहिल्या स्थानी आहे. 

सिंम्बॉयसिस पुणे

दहा विद्यापीठे शीर्ष 100 मध्ये

देशातील आघाडीच्या 100 विद्यापीठात महाराष्ट्रातील दहा संस्थानी स्थान मिळविले. यात होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई 16 व्या स्थानी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 23व्या स्थानी , सिम्बॉयसिस युनिवर्सिटी  पुणे 31 व्या स्थानी आहे. इन्स्टिट्युूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई 35 व्या स्थानी आहे, दत्ता मेघे इन्स्टिट्युूट , वर्धा 42 व्या स्थानी आहे, डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे 44व्या स्थानी आहे. एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , मुंबई 49 व्या स्थानी आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई 58 व्या स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ मुंबई 61 व्या स्थानी , भारती विद्यापीठ पुणे 78 व्या स्थानी आहे. 

शीर्ष महाविद्यालयात पिछाडी 

फर्गसन महाविदयालय, पुणे

देशातील चांगल्या 100 महाविद्यालयात महाराष्ट्रातील चारच महाविद्यालये स्थान मिळवू शकले. त्यातही   मात्र पहिल्या 40 मध्ये  महाराष्ट्रातील एकही महाविद्यालय नाही. 45 वया स्थानी फर्गसन महाविद्यालय, पुणे आहे. शासकीय विज्ञान संस्था , नागपूर 64 व्या स्थानी आहे.सेंट झेवियर, मुंबई 89 व्या स्थानी आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालय , अमरावती 99 व्या स्थानी आहे. 

पाच अभियांत्रिकी 

देशातील आघाडीच्या 100 अभियांत्रीकी महाविद्यालयात महाराष्ट्रातील पाच संस्थानी स्थान मिळविले. यात आय्.आय.टी. मुंबई 3 -या स्थानी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी, नागपूर 39 व्या स्थानी, इन्स्टिट्युूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई 41 व्या स्थानी, डिफेन्स इन्स्टिट्युूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, पुने 63 व्या स्थानी , सीओईपी पुणे 77 व्या स्थानी  आहे. 

चार संशोधन संस्था 

आय. आय .टी. मुंबई

देशातील आघाडीच्या 50 संशोधन संस्थामध्ये महाराष्ट्रातील चार संस्था आहेत. आय्.आय.टी. मुंबई 34 थ्या स्थानी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट , मुंबई 6 व्या स्थानावर, टाटा इन्स्टिट्यूट  ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई 12 व्या स्थानावर, आय्‍.आय्.एस.सी., पुणे 29 व्या स्थानी, इन्स्टिट्यूट  ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई 40 व्या स्थानी आहे. 

 व्यवस्थापन संस्थात आघाडी

देशातील शीर्ष 100 व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्राची आघाडी आहे.  आय.आय.एम. मुंबई  6 व्या स्थानी आहे. आय.आय.टी.मुंबई 10 स्थानी, सिंम्बॉयसिस मॉनेजमेंट इन्स्टिट्युूट, पुणे 14 व्या स्थानी , एन.एम. इन्स्टिट्युूट , मुंबई 20 व्या स्थानी आहे. एस.पी. इन्स्टिट्युूट मुंबई 26 व्या स्थानी आहे. आय.आय.एम. नागपूर 31 व्या स्थानी , के.जे. सोमय्या मॅनेजमेंट इन्स्टिट्युूट, मुंबई 63 व्या स्थानी, वेलिंगकर इन्स्टिट्युूट, मुंबई 84 व्या स्थानी, नॅशनल इन्स्टिट्युूट ऑफ बंक मॅनेजमेंट , पुणे 91 व्या स्थानी  आहे

 फार्मसी संस्थात आघाडी 

देशातील चांगल्या 100 फार्मसी महाविद्यालयात महाराष्ट्रतील 11 संस्थांनी स्थान मिळविले आहे. यात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई 5 व्या स्थानी आहे.एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , मुंबई 10प्‍ व्या स्थानी आहे. पूना कॉलेज ऑफ फार्मसी 35 व्या स्थानी, डी. वाय्‍. पाटील फार्मसी, पुणे 36 व्या स्थानी , नानावटी फार्मसी, मुंबई 39 व्या स्थानी, रा्ष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ 51 व्या स्थानी, आर.सी. पटेल फाम्‍॒सी कॉलेज, शिरपूर 56 व्या, भोयर फार्मसी कॉलेज ,नागपूर 61 व्या, कृष्णा विश्व विद्यापीठ , कराड 67 व्यास्थानी, एम.आय्‍.टी. विदयापीठ, पुणे 72 व्या स्थानी आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई 74 व्या, वाय्‍.बी. चव्हाण फार्मसी कॉलेज , संभाजीनगर 76 व्या स्थानी आहे. भारती विदयापीठ, कोल्हापूर 80 व्यास्थानी, पी.ई.सोसायटीचे फार्मसी कॉलेज , पुणे 96 व्या स्थानी आहे. एआयएसएसएमएस फार्मसी कॉलेज पुणे 99 व्या स्थानी आहे. 

एकच आर्किटेक्चर संस्था निवडली गेली.

देशातील् उत्कृष्ट 40 आर्किटेक्चर संस्थेत केवळ विश्वेशरय्या तंत्रज्ञान संस्था , नागपूर या एकमेवसंस्थेला स्थान मिळविता आले. देशातील निवडलेल्या 40 विधी महाविदयालयात महाराक्ष्ट्रतील तीन संस्था आहेत. यात सिम्बॉयसिस लॉ स्कूल 5 व्या स्थानी आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी , मुंबई 31 व्या स्थानी आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी , नागपूर 34 व्या स्थानी आहे. अव्वल 50 वैद्यकीय महाविदयालयात महाराष्ट्रातील तीन महाविद्यालये स्थान मिळवू शकली. यात डी. वाय. पाटील विद्यापीठ , पुणे 11 व्या स्थानी, दत्ता मेघे इन्स्टिस्ट्यूट वर्धा 23 व्या स्थानी तर आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज 30 व्या स्थानी आहे. 

विश्वेश्व्राय्या तंत्रज्ञान संस्था, नागपूर

अव्वल 40 दंत महाविद्यालयात डी. वाय. पाटील विद्यापीठ , पुणे 5 व्या स्थानी, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर 15 व्या स्थानी , दत्ता मेघे इन्स्टिस्ट्यूट वर्धा 24 व्या स्थानी,शासकीय दंत महाविद्यालय , मुंबई 25 व्या स्थानी,  नायर दंत महाविद्यालय, मुंबई 28 व्या स्थानी , भारती विदयापीठ दंत महाविद्यालय पुणे 36 व्या स्थानी आहे. 

कृषीविषयक एकच संस्था निवडली गेली 

कृषी क्षेत्राशी संबंधित 40 संस्थात केवळ फिशरीज युनिवर्सिटी , मुंबई ही महाराष्ट्रतील  एकमेव संस्था असून ती 11 व्या स्थानी राहिली. आघाडीच्या दहा इनोवेशन संस्थात आ. ााय्‍.टी.मुंबई पहिल्या स्थानी आहे. 

फिशरीज युनिवर्सिटी , मुंबई

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments